Pandharpur Wari 2024 Live Updates : विठ्ठल - रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न

नेहा चौधरी Wed, 17 Jul 2024-10:56 am,

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : पंढरपुरातील वातावरण विठुमय झालाय. हरीनामा जप आणि विठ्ठल भक्तांनी पंढरपुरीनगरी नटलीय. संतांच्या पालख्या इंद्रायणी काठी विसावल्या असून टाळ मृदंग, भजन, कीर्तनाने विठूनगरी दुमदुमली आहे. या आनंदवारी आषाढी सोहळ्याची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा
हरे चिंता, व्यथा क्षणाधारत…
सोड अहंकार सोड तू संसार
क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून ....
आषाढी एकादशी उद्या राज्यभरात साजरी होत आहे. आळंदीहून पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांच्या दमलेल्या, थकलेल्या डोळ्यांना आता विठूमाऊलीच्य़ा दर्शनाची आस आहे. आज आषाढी एकादशीला वारकरी आणि विठुरायाचं मिलन घडतंय. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची महापूजाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली. या सोहळ्याचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

Latest Updates

  • Mumbai Prati Pandharpur Wadala Live Updates : मुंबईच्या प्रतिपंढरपूर मंदिरात भाविकांची गर्दी

    मुंबईतील प्रतिपंढरपूर वडाला विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भक्तांकडून भजन किर्तन करण्यात येत आहे. पंढरपूरच्या मंदिरामध्ये, विठोबा आणि त्याची पत्नी रुक्मिणी यांच्या मूर्ती वेगळ्या ठेवलेल्या आहेत. परतून वडाळा येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती एकाच ठिकाणी आहेत. 4,000 चौरस मीटर मंदिर परिसरात गणपती आणि शिवाची मंदिरे देखील आहेत. आज आषाढीनिमित्त मंदिर परिसरात जत्रा भरते. 

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : शासकीय पूजा भक्तीभावाने संपन्न

    आषाढ शुद्ध एकादशीला श्री विठ्ठल आणि रूक्मिणी मातेची शासकीय पूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांची पत्नी लता  शिंदे आणि मानाचा वारकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई बाळू अहिरे राहणार नाशिक जिल्ह्यातील अंबासन तालुका सटाणा या दोन्ही मान्यवर जोड्यांच्या हस्ते संपन्न झाली.

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : पांडुरंग आपल्या सर्वसामान्यांचा परमेश्वर आहे, म्हणून...

     पांडुरंग आपल्या सर्वसामान्यांचा परमेश्वर आहे, हे सरकार देखील सर्वसामान्यांचंय आहे. यामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही, एवढी खात्री मी आपल्याला देतो. मी रस्त्यानं येताना पाहतो एवढं प्रेम वारकरी बांधव-भगिनींचं मिळतंय, हे भाग्य माझ्या नशिबात मला मिळालं. त्यामुळं मी आपला ऋणी आहे.

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : तिरूपती बालाजी धर्तीवर टोकन पद्धतीने दर्शन, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : तिरुपती बालाजी धर्तीवर टोकन पद्धतीने दर्शन, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

    तिरुपती बालाजी धर्तीवर पंढरपुरात टोकन पद्धतीने दर्शन व्यवस्था लवकरच सुरु करणार आहोत. त्यासाठी 3 कोटीचं मानधन देणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : 'सुगीचे सोन्याचे दिवस शेतकऱ्याच्या जीवनात येऊ दे', मुख्यमंत्र्यांचं विठुरायाकडे साकडं

    मुख्यमंत्र्यांनी पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल जयघोषाने भाषणाची सुरुवात केली. आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे कारण तिसऱ्यांदा महापूजा मान मिळाला आहे. त्यासोबत आज चार पिढ्याने एकत्र पूजा केली. माझे वडीलही पूजेला उपस्थितीत होते. सुगीचे सोन्याचे दिवस शेतकऱ्याच्या जीवनात येऊ दे, शेतकरी सुखी समृद्ध झाला पाहिजे, असं साकडं विठुरायाचा चरणी घातलंय, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : मानाचे वारकरी यांची सत्कार 

     मानाचे वारकरी नाशिक जिल्ह्यातील अहिरे दाम्पत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एसटी मंडळाकडून वर्षभरासाठी अहिरे दाम्पत्याला एसी मोफत प्रवास पास देण्यात आला. 

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : विठ्ठल - रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न

    आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा संपन्न झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासगार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे असं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. त्यासोबत मानाचे वारकरी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंबासन गावातील सौ. अशाबाई बाळू अहिरे  आणि बाळू शंकर अहिरे दाम्पत्य उपस्थितीत होते. 

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांची पंढरपूर मंदिर समितीकडून सत्कार 

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांची पत्नी लता शिंदे आणि मानाचे वारकरी नाशिक जिल्ह्यातील अहिरे दाम्पत्याचा पंढरपूर मंदिर समितीकडून सत्कार करण्यात आला. 

     

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : विठ्ठलाची महापूजा संपन्न 

    विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि मानाचे वारकरी अहिरे दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. इथं रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून पूजा करण्यात आली. 

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा

    आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा सुरु आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासगार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे असं संपूर्ण कुटुंब उपस्थित आहेत.

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : यंदा नाशिक जिल्ह्यातील अहिरे दाम्पत्याला विठुराच्या पूजेचा मान 

    विठ्ठलाच्या पूजेसाठी मानाचा वारकरी यंदा नाशिक जिल्ह्यातील दाम्पती ठरले आहेत. सटाणा तालुक्यातील अंबासन गावातील सौ. अशाबाई बाळू अहिरे वय 50 आणि श्री बाळू शंकर अहिरे वय 55 यांना संधी मिळाली आहे. अहिरे दाम्पत्य गेल्या 16 वर्षापासून पंढरीची वारी करत आहेत.

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : आषाढी एकादशीला 6 शुभ योग! 

    आषाढी एकादशीला अनेक शुभ योग जुळून आलेत. बुधवारचा दिवस पंचांगाच्या दृष्टीकोनातून शुभ योग, राहु काल, चंद्राची रास जाणून घ्या. 

    Ashadhi Ekadashi Panchang : आषाढी एकादशीला 6 शुभ योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : आषाढी एकादशी खास शुभेच्छा 

    विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन घेऊन आषाढी एकादशीचा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या मंगलमय दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या खास शुभेच्छा नक्कीच तुमच्या कामात येईल. 

    आषाढी एकदाशी खास शुभेच्छा - Ashadhi Ekadashi Wishes: आषाढी एकादशीनिमित्त 'या' खास शुभेच्छा प्रियजनांना पाठवा अन् विठुरायाचा भक्तीत तल्लीन व्हा

     

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : आषाढी एकादशीसाठी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

    आषाढी एकादशीसाठी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज असून यावर्षी दुप्पट लोक वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अहोरात्र काळजी घेत आहेत. पंढरपुरात भाविकांना येण्यासाठी 5 हजार एसटी बसची सोय करण्यात आली आहे. 

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : महापूजा सोहळा बुधवारी 17 जुलैला मध्यरात्री 2.00 सुरु होणार

    एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मानाचे वारकरी आणि 10 मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांसह मुख्यमंत्री महापूजा करणार आहेत. हा सोहळा बुधवारी 17 जुलैला मध्यरात्री 2.20 वाजता सुरु होणार आहे. 

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : पंढरपूरनगरी भाविकांनी सजली

    चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील 65 एकर जागा भाविकांनी सजलीय. शहरातील मठ,धर्मशाळा या ठिकाणी भाविक मुक्कामी आहेत. तसंच रस्त्याकडेला राहुट्या, तंबू टाकून भाविक भजन, कीर्तन, हरिनामाचा जयघोष कानी पडत आहे. शहरातील लॉज ,भक्त निवास हे देखील हाऊसफुल्ल झाले आहेत. मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.चंद्रभागा नदी, वाळवंट भाविकांची गर्दी दिसून येत आहे. नदीचे स्नान,भटक पुंडलिक मंदिराचे दर्शन घेवून भाविक दर्शन रांगेत उभा आहे.

     

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी …प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे…

    एस टी, जादा रेल्वे तसंच खासगी वाहनातून भाविक मोठ्या संख्यने येत आहेत. त्याच बरोबरीने संतांच्या पालख्या सोबत देखील मोठ्या संख्येने भाविक आहेत. आषाढ दशमी म्हणजे मंगळवारी पंढरी नगरीत जवळपास 12 लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. 

     

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी' उपक्रमाचा समारोप

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : पंढरपूरच्या विठ्ठल - रुक्मिणीला मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांकडून खास पोशाख

     
     
     
     

     
     
     
     
     
     
     
     
     
     
     

    A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : आषाढी एकादशीला घरच्या घरी पूजा कशी करायची?

    आषाढी एकादशीला प्रत्येकाला मंदिरात जाऊन विठु माऊली आणि रुक्मिणीची पूजा करणे शक्य नसतं. अशावेळी घरच्या घरी माऊलीची पूजा कशी करायची जाणून घ्या. 

    सविस्तर माहिती वाचा - आषाढी एकादशीला घरच्या घरी 'अशी' करा विठ्ठलाची पूजा; जाणून घ्या मुहूर्त, साहित्य, विधी

     

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : आषाढी एकादशीसाठी खास बंगळूरहून पोशाख

    आषाढी एकादशी दिवशी लाडक्या विठुराया आणि रुक्मिणी मातेलाही खास पोशाख बेंगलोरमध्ये बनविण्यात आला आहे. विठुरायाला भगव्या रंगाची मखमली अंगी बनविण्यात आली असून यावर संपूर्णपणे हाताने भरजरीत कलाकुसर करण्यात आलीय. देवाला बंगलोरी सिल्कचे अतिशय मुलायम असे सोवळे आणण्यात आले असून त्यावर भगव्या रंगाचीच मखमली शेला परिधान केला जाणार आहे. रुक्मिणीमातेलाही अतिशय उंची भरजरी सिल्कची नऊवारी साडी खास बनवून बेंगलोर येथून आणण्यात आल्याचे मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : आषाढी एकादशीला विठुरायाच्या महापूजेबाबत मोठा निर्णय

    दरवर्षी आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi 2024) श्री विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्याचा मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीचा असतो. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात ही परंपरा आहे. मात्र, यंदा याला जोडूनच एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. या वर्षी आषाढीच्या शासकीय महापूजेस 10 मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना निमंत्रण दिलं जाणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत पालखी प्रमुखांनाही महापूजेचा मान मिळणार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) हा मोठा निर्णय घेतला आहे.

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : बाजार समितीमधील कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  बाजार समितीमधील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात पोहोचले आहेत. बेदाण्याचा हार घालून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कृषी प्रदर्शनात सत्कार करण्यात आला. रामकृष्ण हरी म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाषण सुरू केली. पंढपुरात येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बसला अपघातात जखमी झालेल्या 45 लोकांची विचारपूस केली. एम जी एम हॉस्पिटलमध्ये त्यांनी जखमींची भेट घेतली. 

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : पंढरपुरात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला

    आषाढी यात्रेला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा ताफा अखिल भारतीय होलार समाजाने अडवला. मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर घोषणाबाजी केली. आर्थिक विकास महामंडळ आणि अभ्यास आयोगासाठी समाज आक्रमक झालाय. 

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरनगरी सजली

    आषाढी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावरील दोन्ही शिखरे, संत नामदेव महाद्वार, संत ज्ञानेश्वर मंडप, संत तुकाराम भवन या ठिकाणी विद्युत रोषणाई केली आहे. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

  • Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : पंढपुरात सुंदर अशी तुळशी पंढरी नावाची प्रतिकृती 

    पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून तुळशी पंढरी नावाची प्रतिकृती तयार केलेली आहे. यामध्ये एक उंच तुळशी वृंदावन तयार केलेला आहे. सोबत त्याच्या भोवताली लहान लहान असे तुळशी वृंदावणे तयार केले आहेत. सोबतच वारकरी आपल्या भजन कीर्तन साठी जी वापरतात ती वाद्य टाळ मृदुंग विना यांच्याही प्रतिकृती त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. पहिल्यांदाच पंढरपूरमध्ये अशा पद्धतीचा शिल्प तयार केला आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link