Loksabha Election 2024 Live: प्रियंका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी

Wed, 08 May 2024-7:42 pm,

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्याचं मतदान पार पाडलं. यानंतर आता चौथ्या टप्प्याच्या निवडणूकांच्या प्रचाराकडे मोर्चा वळणार आहे.

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्याचं मतदान पार पाडलं. यानंतर आता चौथ्या टप्प्याच्या निवडणूकांच्या प्रचाराकडे मोर्चा वळणार आहे.

Latest Updates

  • Loksabha Election 2024 Live:
    उत्तर प्रदेशमधल्या रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघासाठी प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमध्ये ठिय्या मांडून आहेत. काँग्रेसने उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्यावर सोपवली आहे. रायबरेलीतून राहुल गांधी निवडणुकीच्या मैदानात आहेत. 

  • सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची अंतिम टक्केवारी जाहीर

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये 59.19 टक्के मतदान, तर माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये 63.65 टक्के मतदान

    सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळमध्ये सर्वाधिक 63.15 टक्के मतदान, तर माढा लोकसभा मतदारसंघात 66.13 टक्के सर्वाधिक मतदान

    2019 च्या तुलनेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात 0.73 टक्के मतदानात वाढ

  • आदित्य ठाकरे यांचा उद्या मावळ लोकसभा दौरा

    मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांच्या उद्या दोन सभा, सायंकाळी 4 वाजता खारघर आणि कामोठे येथे बाईक रॅलीच आयोजन 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    रात्री 6.30 वाजता कर्जत येथे पहिली सभा, तर रात्री 8.30 वाजता आदित्य ठाकरे यांची उरण येथील नानासाहेब धर्माधिकारी मैदानात सभा

    उद्धव ठाकरे यांची आज मावळ येथे सभा होत असताना उद्या आदित्य ठाकरे उर्वरित मावळ लोकसभेत प्रचार करणार

  • ही लढाई विचारांची आहे : रोहित पवार 

    गेले काही दिवस पवार साहेबांची तब्बेत ठीक नाही, सुप्रिया ताई, आम्ही सगळे त्यांना विनंती करतोय, पण पवार साहेब कोणाचं ऐकत नाही. ते म्हणतात मी जर थांबलो, तर भाजपच्या महाशक्तीला ताकद मिळेल, मी थांबणार नाही. कारण त्यांना माहिती आहे ही लढाई विचारांची आहे - रोहित पवार 

  • स्वतःच्या स्वार्थासाठी जात विकू नका, खोटे बोलून जातीची फसवणूक करू नका - मनोज जरांगे पाटील

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    समाज म्हणून आतापर्यंत कुणीच कामाला आलेलं नाही. महाविकास आघाडी, महायुती, अपक्ष माझा विरोध कुणालाही नाही. मीही राज्यामध्ये अनेक जणांना उभं करू शकलो असतो मात्र मतांची विभागणी होईल म्हणून उभं केलं नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

     

     

  • नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे 17 मे रोजी एकाच मंचावर

    लोकसभा निवडणूक प्रचार आणि सभा संदर्भात आज मनसे नेत्यांनी बैठक पार पडली. या बैठकीला मनसे अमित ठाकरे,बाळा नांदगावकर , नितीन देसाई ,संदीप देशपांडे यांच्यासह पदाधिकारी हजर होते. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यापासून मनसेचे सर्व कार्यकर्ते मन लावून प्रचारात उतरले आहेत. आता येत्या 17 मे रोजी राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकत्रित जाहीर सभा होणार आहे, असे बाळा नादगांवकर म्हणाले. 

  • पूर्वी देशभरातील निवडणुका 2 दिवसात व्हायची, आता महाराष्ट्रात 4 टप्प्यात होत आहे. तामिळनाडू मध्ये एकाच टप्प्यात आहे. महाराष्ट्रात 4 टप्प्यात का? कारण मोदींना राज्याचे जास्त प्रचार करता यावा, असेही शरद पवार यांनी म्हटले. 

  • मोदी काल इथे आले राज्यात येतात माझ्यावर उद्धव ठाकरे यांच्यावर बोलतात काही हरकत नाही आमच्यावर बोलले हा आमचा बहुमान आहे -  शरद पवार

  • रावसाहेब दानवेंचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज

    उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जालन्यात होणाऱ्या सभेत मविआच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करावं. उद्धव ठाकरेंनी नाव जाहीर केलं तर मी राजकारण सोडेन असं चॅलेंज दानवेंनी ठाकरेंना दिलंय. 

  • प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं मला वाटत नाही., शरद पवारांचा अनुभव मोठा आहे ते काय संकेत देत असतील मला महिती नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी शरद पवारांच्या विधानावर दिली आहे.

  • रुपाली चाकणकरांनी रोहित पवारांवर साधला निशाणा 

    रोहित पवारांवर निवडणूक आयोगाने लक्ष ठेवावं असं वक्तव्य रुपाली चाकणकरांनी गेलंय. गेल्या एक ते दीड महिन्यांपासून रोहित पवार ज्या प्रकारे ट्विट करतायत, ज्या प्रकारे विधानं करतायत त्यातून जनतेत संभ्रम निर्माण होत असल्याचा आरोप चाकणकरांनी केलाय. रोहित पवारांची भावना ही नैराश्याची असून त्यांचा कुठेही विजय होणार नाही असं म्हणत रुपाली चाकणकरांनी रोहित पवारांवर निशाणा साधलाय.  

  • राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी सक्रीय झाल्यानंतर मनसेविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय.. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत बिनशर्त पाठिंब्यावरून आदित्य ठाकरेंनी मनसेवर निशाणा साधला.. मुंबईत मराठी माणसाला विरोध करणाऱ्या गुजरातींना मनसेचा बिनशर्त पाठिंबा आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. उत्तर भारतीयांना मारहाण करणा-या मनसेचा पाठिंबा भाजपला चालतो का? अशी विचारणाही त्यांनी भाजपला केली.

  • Exclusive : महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देण्यावरून राज ठाकरेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, भाजपला... 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

    काय म्हणाले आदित्य ठाकरे? पाहा सविस्तर बातमी... - पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, 'काँग्रेस आणि आमच्या..'

  • पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, 'काँग्रेस आणि आमच्या..'

    महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली आहे. शरद पवारांनी राजकीय भवितव्यासंदर्भात केलेल्या एका मोठ्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात भविष्यात मोठा भुकंप होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा काँग्रेसमध्ये विलिन होऊ शकतो अशा चर्चा पवारांच्या या विधानामुळे जोर धरु लागल्या आहेत. बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

  • बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान संपताच पुण्यातील वारजे परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. मंगळवारी रात्री उशिराने ही घटना घडली. आरोपींनी हवेत गोळीबार केला असून, गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही. गोळीबार करणारे आरोपी कात्रजच्या दिशेने पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

  • लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचलाय. आज शिरूरमध्ये अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची सभा होणार आहे. अहमदनगरमध्येही पवारांची सभा होणार आहे.. तर संजय वाघेरेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सांगवीत सभा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांच्याही आज नंदुरबार आणि अहमदनगरमध्ये सभा होणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संगमनेरमध्ये सभा घेणार आहेत. श्रीगोंदा आणि अहमदनगरमध्ये खासदार संजय राऊत मविआच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगेंच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर बीडमध्ये सभा घेणार आहेत.

  • नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिरपूरमध्ये असून सकाळी 9:30 वाजता त्यांची सभा संपन्न होणार आहे.

  • शरद पवार यांच्या आज 4 सभा

    शरद पवार पुन्हा एकदा उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय झालेत. तब्येत बरी नसल्याकारणाने त्यांनी त्यांचा एक दिवसाचा दौरा रद्द केला होता, मात्र आज शरद पवारांच्या आज चार सभा होणार आहेत. सकाळी 11 वाजता श्रीगोंदामध्ये मविआच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी संजय राऊत आणि शरद पवारांची सभा होणार आहे. त्यानंतर शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हेच्या प्रचारासाठी शरद पवार यांची दुपारी २ वाजता शिरूर शहरातील पाचकंदील चौकात जाहीर सभा होणार आहे. तर संध्याकाळी पाच वाजता अहमदनगर इथे शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांची जाहीर सभा होणारेय. तर ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासाठी उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सह दिग्गज नेत्यांची सभा संध्याकाळी सांगवीतल्या pwd मैदानात होणार आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link