Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Sun, 08 Dec 2024-7:54 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 08 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये दोन गटांत तुफान राडा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Beed Rada : बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये तुफान राडा. मोगरा गावात दोन गटांमध्ये मारहाण.. यात्रेदरम्यान कुस्ती सुरू असताना दोन गट आपापसात भिडले..  कुस्तीच्या कारणावरून जोरदार राडा.. गावामध्ये तणावाचं वातावरण. 

     

     

  • पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची घमकी

     

    Pune Railway Station Threat : पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी.. पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला आला धमकीचा फोन..  अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणे फोन केल्याची पुणे पोलिसांची माहिती. फोन करणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात. 

  • दिल्लीकडे निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा अडवला

     

    Delhi Farmer Agitation : दिल्लीकडे निघालेल्या आंदोलक शेतक-यांचं आंदोलन संघटनांनी आजच्या दिवसापुरतं थांबवलं आहे. मात्र त्यांचा मोर्चा सुरुच राहणार आहे. पोलिसांनी शंभू सीमेवरच मोर्चा अडवला. पंजाब-हरियाणा सीमेवर त्यांनी शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा माराही केला, 8 ते 9 आंदोलक शेतकरी जखमी.. हमीभावासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढलाय. मात्र पोलीस आणि सुरक्षा दल त्यांना पुढे जाऊ देत नाही. दरम्यान, सरकारनं आपल्याला चर्चेचं निमंत्रण दिलं नाही, आपल्याला खोटी माहिती दिली जातेय, असा आरोप शेतकरी नेते सरवन सिंह यांनी केलाय. उद्या दुपारी 12 वाजता 101 शेतकऱ्यांचं प्रतिनिधी मंडळ पुन्हा एकदा शांततेत दिल्लीकडे कूच करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

  • पराभवातून शरद पवारांनी शिकायला हवं- चंद्रशेखर बावनकुळे

     

    Chandrashekhar Bawankule on Sharad Pawar : चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार सध्या मारकडवाडीत ग्रामस्थांशी संवाद साधतायत. यावरूनच 'पराभव झाला तर स्वीकारायला हवा, पराभवातून शरद पवारांनी शिकायला हवं असं बावनकुळेंनी म्हटलं. पवार जनतेची दिशाभूल करतायत मात्र जनता त्यांच्याबाजूने नाही...ईव्हीएमवर आधी आक्षेप का घेतला नाही असा सवालही बावनकुळेंनी विचारला.

  • शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार

     

    Shivsena MLA : शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार...मंत्रिमंडळात समावेशासाठी इच्छुक आमंदारांचं प्रगती पुस्तक...प्रगती पुस्तकात संजय राठोड, अब्दुल सत्तार नापास...5 आमदार प्रगती पुस्तकात पास

  •  विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरच

     

    Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरच...राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवड निश्चित...दुपारी 12वाजेपर्यंतच अर्ज भरण्याची मुदत...एकमेव अर्ज आल्यानं नार्वेकरांची निवड निश्चित

  • मविआच्या नेत्यांनी घेतली आमदारकीची शपथ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Leaders of Mahavikas Aghadi took the oath of MLA : मविआचे नेत्यांनी घेतली आमदारकीची शपथ...अधिवेशनाच्या दुस-या दिवशी घेतली शपथ...जय संविधान म्हणत घेतली आमदारकीची शपथ...पटोले, वडेट्टीवार, आदित्य ठाकरेंनी घेतली शपथ

     

  • विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकरांचा अर्ज दाखल

     

    Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षपदासाठी नार्वेकरांचा अर्ज दाखल...राहुल नार्वेकरांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला...मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल...भाजपकडून राहुल नार्वेकरांना पुन्हा संधी
     

  • राहुल नार्वेकर आज विधाससभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rahul Narvekar : विधाससभा अध्यक्षपदासाठी आज अर्ज भरता येणार... राहुल नार्वेकर आज अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार?...राहुल नार्वेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब-सूत्र... चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवारांची नावं चर्चेत

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

     

  • विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक

     

    Legislative Affairs Advisory Committee meeting today : विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक...बैठकीत नागपूर अधिवेशनाबाबत चर्चा-सूत्र...नागपूर अधिवेशनाची तारीख आजच ठरणार-सूत्र...विरोधक बैठकीत सामील होणार का याकडे लक्ष

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

     

  • राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर?

     

    State Cabinet Expansion : 11 व 12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता कमीच-सूत्रांची माहिती..मंत्र्यांच्या नावांची निवड, तीनही नेत्यांच्या नावांवर चर्चा आणि त्यानंतर केंद्रातून मंजुरी या प्रकियेला वेळ लागण्याची शक्यता-सूत्र..विशेष अधिवेशन उद्या पर्यंत चालणारेय, त्यामुळे एका दिवसात ही सर्व प्रकिया होणे कठीण - सूत्र.. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी सांगितल्या प्रमाणे 11, 12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हं धुसर आहेत - सूत्र

  • उद्या माणगावात ईव्हीएम विरोधात राजेंद्र ठाकूरांचं आंदोलन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rajendra Thakur : विधानसभा निवडणूकीत श्रीवर्धन मतदार संघातील पराभूत अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर यांनी ईव्हीएम विरोधात दंड थोपटलंय. आपला पराभव हा केवळ ईव्हीएममुळेच झाल्‍याचा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे उद्या माणगावात ते जनआंदोलन करणारेत.आंदोलनाला कॉंग्रेस, शेकापसह इतर राजकीय पक्षांचा पाठिंबा असून साधारण 2 हजार लोक या आंदोलनात सहभागी होतील, असे राजेंद्र ठाकूर यांनी सांगितलंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • शरद पवार आज मारकडवाडीला भेट देणार 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar is going to visit Markadwadi today​ : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आज सोलापुरातील मारकडवाडीचा दौरा करणार आहेत. राष्ट्रवादी SP पक्षाचे नवनिर्वाचित आमदार उत्तमराव जानकर यांनी EVMविरोधात भूमिका घेतली आहे. त्याबाबत मारकडवाडीतील ग्रामस्थांना भेटून, त्यांच्याशी पवार संवाद साधणार आहेत. आज सकाळी साडे दहा वाजता शरद पवार माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावाचा दौरा करणार आहेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • प्रतापगडावरील शिवरायांच्या पुतळ्यावर आज हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी

    साताऱ्यातील प्रतापगडावर आज शासनाकडून शिवप्रताप दिन साजरा केला जाणार आहे. यात हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली जाते.

  • उद्या अध्यक्षपदाची निवडणूक; अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख

    विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक 9 डिसेंबरला होणार आहे. आज दुपारपर्यंत अर्ज भरता येणार आहे. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी यासंदर्भात विधानसभेत घोषणा केली.

  • मारकडवाडी होणार ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा केंद्रबिंदू 

    ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा केंद्रबिंदू मारकडवाडी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि  जयंत पाटील आज मारकडवाडी दौऱ्यावर आहेत. शरद पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार उत्तमराव जानकर यांनी ईव्हीएमविरोधात घेतलेल्या भूमिकेबाबत चर्चा करणार आहेत. तसेच मारकडवाडीत राहणाऱ्या गावकऱ्यांशी देखील शरद पवार संवाद साधणार आहेत. आज सकाळी साडेदहा वाजता शरद पवार, जयंत पाटील जाणार माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी गावाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

  • आज महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक

    आज सकाळी मविआच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. आमदारांची  बैठक सकाळी 10 वाजता होणार आहे. मविआच्या आंदोलनाआधी ही बैठक होणार आहे.

  • मविआ विधानभवन पायऱ्यावर आज आंदोलन करणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mahavikas Aghadi : आज मविआ विधानभवन पाय-यावर आंदोलन करणार...विधानभवनात परिसरात ईव्हीएमविरोधात आज आंदोलन...शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन आंदोलन करणार...शपथविधीबाबत मविआ नेते आजचं पुढील निर्णय घेणार

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • शेतकरी आज दिल्लीच्या दिशेने

    शेतकरी आज पुन्हा दिल्लीकडे कूच करणार आहेत. एसकेएम नेते पंढेर यांनी शनिवारी ही घोषणा केली. शंभू सीमेवर शेतकरी उभे आहेत. पंढेर शनिवारी बोलताना, उद्या शेतकरी दिल्लीकडे कूच करणार आहेत, सांगितलं. शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. शंभू सीमेवरील शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर यांनी सांगितले की, आपण सरकारच्या निमंत्रणाची वाट पाहत आहोत. सरकारकडून चर्चेचा प्रस्ताव न आल्यास 101 शेतकरी रविवारी दुपारी 12 वाजता शांततेत आंदोलन करतील.

  • मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट 

    मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. 4 महिलांसहीत 11 जणांच्या सोन्याच्या चैनींवर चोरांनी डल्ला मारला. तर कार्यकर्त्यांची हजारोंची रोकड घेऊन चोर पसार झाले आहेत. चोरांनी तब्बल 12 लाख रुपयांचे ऐवज लंपास केला. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link