Maharashtra Breaking News LIVE: कल्याण अत्याचार प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 28th December 2024: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर
Latest Updates
कल्याण अत्याचार प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण प्रकरणात ३० दिवसांत चार्जशीट फाईल करणार. तसेच दोषींना ४ महिन्यात कठोर शिक्षा सुनावणार पीडितेच्या कुटुंबाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन महत्त्वपूर्ण समित्यांची घोषणा आज केली.
1) प्रदेश संघटनपर्व समिती चे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली.
भाजपाच्या संघटनात्मक बांधणीचे नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
महाराष्ट्रात 21 डिसेंबरपासून संघटनपर्व सुरू करण्यात आले आहे. या पर्वाची सुरुवात नागपूर येथून कऱण्यात आली.2) प्रदेश अनुशासन समिती च्या अध्यक्षपदी माजी आमदार प्रा अनिल सोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या समितीत छ.संभाजीनगरचे किशोर शितोळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, मुंबईचे माजी आमदार अतुल शाह व पुणे येथील योगेश गोगावले यांना सदस्य म्हणून नियुक्त केले.3) प्रदेश सक्रिय सदस्यता अभियाना ची घोषणा केली. अभियानाचे प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे (पुणे) व बीड येथील प्रवीण घुगे यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे CID चे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना आदेश. बंदुकी सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बीड पोलिस अधीक्षकांना आदेश, तातडीने फेरआढावा घ्या असेही त्यांनी आदेशता म्हंटले आहे.
नवं वर्षाचं स्वागत, नवी मुंबई पोलिसांची सर्वत्र राहणार करडी नजर
नवं वर्षाचं स्वागत करताना सावधान कारण नवी मुंबई पोलिसांची करडी नजर सर्व नागरिकांवर राहणार आहे. सर्वत्र पोलीस पेट्रोलिंग आणि चौकाचौकात नाकाबंदी करुन मद्यप्राशन करुन वाहन चालविणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासोबतच बार, पब आणि फार्महाऊस वर देखील पोलिसांची करडी नजर राहणार आहे. शहरातील सिसीटीव्हीच्या माध्यमातून कुठेही अनुचित प्रकार घडू नये यावर देखील पोलीसांचे विशेष लक्ष राहणार असून अमली पदार्थांचे सेवन केल्यास पोलिसांच्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांनी नवं वर्षाचं स्वागत उत्साहात मात्र सुरक्षित पद्धतीने करावे असे आवाहन नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केलेय.
धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा हक्क नाही- खासदार बजरंग सोनवणे
9 तारखेला खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. खंडणीखोरचां मास्टर माईंड कोण आहे? धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा हक्क नाही, अशी टीका खासदार बजरंग सोनवणे यांनी केली.दिवसाढवळ्या खून करतात आणि त्यांच्यामागे प्रशासन पोलीस आहेत. मंत्री झालात तुमची पिलावळ आवरा असे बजरंग सोनावणे यावेळी मुंडे यांना उद्देशून म्हणाले.
धनंजय मुंडेंना अजित पवारांनी हाकलून द्यायला पाहिजे- नरेंद्र पाटील
वाल्मिक कराडला अटक झालीच पाहीजे. धनंजय मुंडे यांना अजित पवारांनी हाकलून द्यायला पाहिजे होते. मुंडेला मंत्री पद द्यायला नको होतं. आमचा देशमुख अठरा पगड जातीचा तो मराठा नाही.
करूळ घाट 15 जानेवारीला सुरू होणार- नितेश राणे यांचे संकेत
मागील वर्षभर बंद असलेला तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा असलेला करूळ घाट 15 जानेवारी पर्यंत एकेरी वाहतुकीस खुला होण्याचे संकेत मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिलेत. मंत्री नितेश राणे यांनी आज करूळ घाटाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी घाटाचे 50 ते 60 टक्के काम पूर्ण झाले असून 10 जानेवारी रोजी पुन्हा एकदा या घाटाची पाहणी करून मगच 15 जानेवारीला या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात येईल असे सांगितले. त्यासोबत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर लागणारे अतिरिक्त चार्ज कमी करावे यासाठी आपण कारखानदारांशी बोलणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा
प्रकाश आंबेडकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात परभणीच्या घटनेवर चर्चा झाली. लाठी चार्जचे आदेश देणाऱ्यांची न्यायालयीन चौकशी करावी, तसेच ज्या घरांची तोडफोड झालीय त्यांचा खर्च राज्य सरकारने करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.
कल्याणमधील पीडित कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
कल्याणमधील पीडित कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेतली. आरोपीला कुठल्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही, असे वचन मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबियांना दिले आहे. पीडित कुटुंबियांसोबत स्थानिक आमदार सुलभा गायकवाड देखील उपस्थित होत्या.
पालेभाज्या झाल्या स्वस्त
हिवाळा सुरू झाल्याने पालेभाजी ची आवाक वाढली आहे , विशेष म्हणजे गत महिन्यात 30 ते 40 रुपयांवर गेलेली पालेभाज्या आता आठ ते दहा रुपयांना मिळत आहेत , नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मद्ये मोठया प्रमाणात पालेभाजी आवक होत असून , मेथी, शेपू, कंदापात, पालक ,कोथिंबीर जुडी चार ते आठ रुपये ना उपलब्ध आहे तर किरकोळ मार्केट मद्ये 10 ते 15 रुपयांना भेटत आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी निगमबोध घाटावर पोहोचले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप.
राजगुरुनगरमध्ये आज कडकडीत बंद
राजगुरुनगर शहरात आज कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. शहरात दोन चिमुकल्यांवर अत्याचार करुन त्यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे. शहरातील सर्व शाळा, कॉलेजेसलाही सुट्टी देण्यात आली आहे.
बीडमध्ये निघणा-या मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सहभागी होणार आहेत, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे बीड, परभणी दौरा करणारेत. ते संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचं राऊत म्हणाले.
माझा एक भाऊ गेला ....
माझा एक भाऊ गेला तरी माझे अनेक भाऊ सोबत असल्याचं संतोष देशमुख यांच्या बहिणीनं सांगतिलं आहे. माझे लाखो भाऊ न्याय देणार असल्याचं संतोष देशमुख यांच्या बहिणीनं म्हटलं आहे. न्याय देण्याची मागणीही देशमुख यांच्या बहिणीनं केली आहे.
मुख्यमंत्री आरोपींना पाठिशी घालतात-जरांगे
संतोष देशमुख हत्या प्रकरणी मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप केली आहे. तसेच आरोपींना तातडीनं अटक करा अशी मागणी देखील जरांगेंनी केली आहे. आरोपींना मुख्यमंत्री सांभाळतात असा आरोप जरांगेंनी केला आहे. तसेच सर्व मराठ्यांनी मोर्चे काढा तसेच राज्यात मराठ्यांनी मोर्चाची तयारी करा असं आवाहनही जरांगेंनी दिलं आहे.
बीडच्या मोर्चात शिवसेना UBT सहभागी होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
संतोष देशमुख हत्या: न्यायाच्या मागणीसाठी आज सर्वपक्षीय मोर्चा! राऊत म्हणाले, 'खरे गुन्हेगार...' सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज मस्साजोग गावात कडकडीत बंद
--देशमुख कुटुंबीयांसोबत मस्साजोगचे सर्व गावकरी निषेध मोर्चाला बीड येथे जाणार आहेत. सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी, पत्नी, भाऊ व भावजय असं सर्व कुटुंब जाणार बीड येथील निषेध मोर्चाला निघाले आहे. 19 दिवसानंतर ही सरपंच संतोष देशमुख यांच्या सर्व मारेकऱ्यांना अटक नाही.
सुरेश धस यांचं धनंजय मुंडे यांना आव्हान
वाल्मिक कराड याच्यासोबतचे माझे संबंध कसे आहेत ते सांगावेत, असं थेट आव्हान सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना दिलंय. वाल्मिक कराडशी माझे संबंध मधुर, सुमधुर की आणखी कसे ते स्पष्ट करण्याचं आव्हान धस यांनी दिलंय. वाल्मिक कराड याच्याशी सुरेश धस यांचे संबंध असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले होते. त्यावर धस यांनी हे आव्हान दिलं.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकावरून राजकारण सुरू
ज्या ठिकाणी पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार त्याच ठिकाणी स्मारक व्हावं अशी काँग्रेसनं केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. तस पत्रच काँग्रेसनं सरकारला लिहिलं आहे. काँग्रेसच्या पत्रावर आता केंद्र सरकारनं उत्तर दिलं आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा दिली जाईल. मात्र त्याची कायदेशीर प्रक्रिया असते त्यानुसार ट्रस्ट तयार करावा लागणार असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. मात्र यावरून काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलं आहे. काँग्रेस माध्यमांकडे जाऊन स्मारकावरून राजकारण करत असल्याचं भाजपचं म्हणणं आहे.
सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या आज होणार अत्यंसंस्कार
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. दिल्लीतील निगमबोध घाट इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. सकाळी साडे आठ ते साडे दहा वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. सकाळी साडे दहा वाजेनंतर त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर दिल्लीतील निगमबोध घाट इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा महादेव ऍपशी काय संबंध?
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून आक्रमक झालेल्या भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एक मोठा आरोप केला आहे. बीड जिल्ह्यात महादेव ऍपच्या माध्यमातून घोटाळा झालाय.. एकाच व्यक्तीच्या नावे 9 अब्ज रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप सुरेश धसांनी केलाय.. या संपूर्ण प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत केलीये..
संतोष देशमुख हत्ये प्रकरणी आज मूक मोर्चा
संतोष देशमुख हत्ये प्रकरणी आज आरोपींना अटक करा या मागणीसह इतर मागण्यांसाठी आज मूक मोर्चा आयोजन करण्यात आलेला आहे. सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांनी या मोर्चाची हाक दिलेले आहे या मोर्चाला अनेक नेत्यांची देखील उपस्थिती असणार आहे बीड जिल्ह्यातील आजी-माजी आमदार आणि मंत्र्यांसह महाराष्ट्रातील अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालया वरती धडकणार आहे सकाळी 11 च्या दरम्यान या मोर्चाला सुरुवात होईल.