Prakash Ambedkar On Manoj Jarange : महायुती आणि महाविकासआघाडीला टक्कर देण्यासाठी  वंचितचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात तिसरी आघाडी उभारण्याची तयारी सुरु केली आहे. या तिसऱ्या आघाडीत मराठा आंदोलक मनोज जरांगे सामील होऊ शकतात अशी चर्चा रंगली रंगली होती. आम्ही मनोज जरांगे यांच्याशी आघाडी करु शकत नाही असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी याचा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी करु शकत नाही असं वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलंय.. टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी हे मोठं विधान केलंय.. आरक्षणवादी असलो तरी जरांगेंच्या मागणीला आमचा पाठिंबा नाही असं आंबेडकरांनी म्हटलंय. तसंच जरांगेही आमच्यासोबत येऊ शकत नाही कारण त्यांना तडजोड करावी लागेल असंही आंबेडकरांनी स्पष्ट केलंय.. 


दरम्यान,  जे पक्ष मनोज जरांगेसोबत जातील, त्या पक्षांसोबत जाणार नाही, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतलीय... निवडणुकीसंदर्भात काही पक्षांची चर्चाही झाल्याचं आंबेडकर म्हणाले. तर जनरल जागांवर आदिवासी उमेदवारांना उभारणार असल्याचीही घोषणा आंबेडकरांनी केली आहे. 


ओबीसी समाजासाठी प्रकाश आंबेडकरांनी 22 जिल्ह्यांतून 'आरक्षण बचाव यात्रा' काढत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता वेगळं आरक्षण देण्याची मागणी केली होती.. त्यामुळे लोकसभेत सामाजिक युती केलेल्या जरांगेंसोबत विधानसभेत आंबेडकर जाणार नसल्याचं स्पष्ट झालंय.. 


आंबेडकरांनी जरांगेंना विधानसभेत 288 जागा लढवण्याचा सल्ला दिलाय. सगे सोय-यांचा जीआर निघो किंवा न निघो रयतेतल्या गरीब मराठ्याला निजामी, श्रीमंत मराठा न्याय देत नाही. त्यामुळे जरांगे पाटलांनी विधानसभेला 288 पैकी 288 जागा लढवल्या पाहीजेत असं मत प्रकाश आंबेडकरांनी लातुरमध्ये व्यक्त केलंय.