नांदेड: महाविकासआघाडी हा मल्टीस्टारर नव्हे तर हॉरर सिनेमा असल्याची खोचक टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते सोमवारी नांदेडमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकारचे मंत्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशोक चव्हाण यांनी आमचे सरकार म्हणजे मल्टीस्टारर सिनेमा असल्याचे म्हटले होते. सुदैवाने आमचा सिनेमा सध्या बरा चालला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे, कुणालाही वाटले नव्हते की आम्ही एकत्र येऊ. पण हल्ली मल्टिस्टारर सिनेमाचा जमाना आहे. सिनेमात तीन-तीन हिरो पाहिजेत, असेही चव्हाण यांनी म्हटले होते. 


रंगशारदात मनसेची बैठक; आशिष शेलारांच्या उपस्थितीने भुवया उंचावल्या


हाच धागा पकडत देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाणांवर टीकास्त्र सोडले. जनतेला मल्टीस्टारर नव्हे तर हॉरर सिनेमा पाहावा लागत आहे. तसेच सत्ता स्थापन करण्यापूर्वी सोनिया गांधी यांना उद्धव ठाकरे यांनी कोणते पत्र लिहून दिले, याचा खुलासाही मुख्यमंत्र्यांनी करावा, असे फडणवीस यांनी म्हटले. 


रंगशारदात मनसेची बैठक; आशिष शेलारांच्या उपस्थितीने भुवया उंचावल्या


अशोक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात तीन पक्षाचे व तीन विचारांचे सरकार चालणार कसे?, असा सवाल करीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी तीन पक्षाच्या सरकारला (महाविकास आघाडी) विरोध केला होता. परंतु, आम्ही सोनिया गांधी यांना राजी केले. परंतु, त्यावेळी आम्ही घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले. सेनेने जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशाराही अशोक चव्हाण यांनी दिला होता.