MPSC New Syllabus 2025 Updates : राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री (deputy cm of maharashtra) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या (MPSC) परिक्षेचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आज पुण्यामध्ये एमपीएससीच्या (Pune MPSC Students Protest) विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील चर्चेनंतर शिंदे सरकारने (Shinde Government) हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. फडवीस यांनी फोनवरुन आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर या निर्णयासंदर्भातील घोषणा करण्यात आली.


मुख्यमंत्र्यांना दिली माहिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांना अवगत केले. त्यानंतर नवीन अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भातील निर्णय एकमताने घेण्यात आला. नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची विनंती करण्यात आली असून ती मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांकडून या नवीन अभ्यासक्रमाला तत्वतः मान्यता मिळाली आहे.


राज्य सरकार करणार विनंती


एमपीएससीला राज्य सरकारतर्फे यासंदर्भातील विनंती करण्यात येणार आहे. बदललेला अभ्यासक्रमासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आल्याच्या वृत्तानंतऱ आंदोलक विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. अनेक विद्यार्थ्यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल फडणवीस यांचे आभार मानले आहेत. तर काही विद्यार्थ्यांनी यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 



गुलाल उधळून व्यक्त केला आनंद


या निर्णयाची घोषणा करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी गुलाल उधळून आंदोलन ठिकाणी जल्लोष (Pune MPSC Students Celebration) साजरा केला. भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विद्यार्थ्यांनी फडणवीस आणि शिंदे सरकारचे आभार मानले आहेत, असं म्हटलं. पडळकर हे विद्यार्थ्यांबरोबर या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.