पश्चिम महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी
पश्चिम महाराष्ट्रातील निकाल पाहण्यासाठी क्लिक करा.
पुणे: पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगलेल्या कुस्तीचा अखेर निकाल लागला. पवारांनी ही कुस्ती मारत फडणवीसांनी आपणच खरे पैलवान असल्याचे दाखवून दिले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याचा अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विजयी ठरले. त्यामुळे महाराष्ट्रातून 'पवार पॅटर्न' संपवणार अशी गर्जना करणाऱ्यांना शरद पवारांनी चीतपट केले आहे.
संपूर्ण प्रचारात काँग्रेसकडून विशेष असे कष्ट घेण्यात आले नव्हते. परिणामी शरद पवार यांनीच विरोधकांच्या फळीचे एकहाती नेतृत्त्व केले होते. त्यासाठी शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रात झंझावती प्रचार केला होता. साताऱ्यात भर पावसात शरद पवार यांनी घेतलेली सभा या प्रचाराचा उत्कर्षबिंदू ठरली होती. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण फिरल्याची चर्चा होती. अखेर आज निकालांमधून त्याची प्रचिती आली.
पश्चिम महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी
जुन्नर- अतुल बेनके (राष्ट्रवादी काँग्रेस)
आंबेगाव- दिलीप-वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
खेड आळंदी- दिलीप मोहिते-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
शिरूर- अशोक पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
दौंड- राहुल कुल (भाजप)
इंदापूर- दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
बारामती- अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
पुरंदर- संजय जगताप (काँग्रेस)
भोर- संग्राम थोपले (काँग्रेस)
मावळ- सुनील शेळके (काँग्रेस)
चिंचवड- लक्ष्मण जगताप (भाजप)
पिंपरी- अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
वडगाव शेरी- जगदीश मुळीक (भाजप)
शिवाजीनगर- सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
भोसरी- महेश लांडगे (भाजप)
कोथरूड- चंद्रकांत पाटील (भाजप)
खडकवासला- भीमराव तापकीर (भाजप)
पर्वती- माधुरी मिसाळ (भाजप)
हडपसर- योगेश टिळेकर (भाजप)
पुणे कॅन्टोनमेंट- सुनील कांबळे (भाजप)
कसबा पेठ- मुक्ता टिळक (भाजप)
अकोले- किरण लहामटे (राष्ट्रवादी काँग्रेस)
संगमनेर- बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
शिर्डी- राधाकृष्ण विखे-पाटील (भाजप)
कोपरगाव- आशुतोष काळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
श्रीरामपूर- लहुजी कानडे (काँग्रेस)
नेवासा- शंकरराव गडाख (अपक्ष)
शेवगाव- मोनिका राजले (भाजपा)
राहुरी- प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
पारनेर- निलेश लंके (कॉंग्रेस)
अहमदनगर शहर - संग्राम जगताप (कॉंग्रेस)
श्रीगोंदा- बबनराव पाचपुते (भाजपा)
कर्जत जामखेड- रोहित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
मोहोळ- यशवंत माने (राष्ट्रवादी काँग्रेस)
करमाळा- संजय शिंदे (अपक्ष)
माढा- बबनराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)
बार्शी- राजेंद्र राउत (अपक्ष)
मोहोळ- यशवंत माने (काँग्रेस)
सोलापूर शहर उत्तर- देशमुख श्रीरामप्पा (भाजपा)
सोलापूर शहर मध्य- प्रणिती शिंदे (काँग्रेस)
अक्कलकोट- सचीन कल्याणशेट्टी (भाजपा)
सोलापूर दक्षिण- सुभार देखमुख (भाजपा)
पंढरपूर- भारत भालके (राष्ट्रवादी काँग्रेस)
सांगोला- शहाजीबापू पाटील (शिवसेना)
माळशिरस- राम सातपुते (भाजपा)
फलटण- दीपक चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस)
वाई- मकरंद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
कोरेगाव- महेश शिंदे ( शिवसेना)
माण- जयकुमार गोरे (भाजप)
कराड उत्तर- बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
कराड दक्षिण- पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
पाटण- शंभुराजे देसाई (शिवसेना)
सातारा- शिवेंद्रराजे भोसले(भाजप)
चंदगड- राजेश पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
राधानगरी- अबिटकर आनंदराव (शिवसेना)
कागल- मुश्रीफ हसन मियालाल (कॉंग्रेस)
कोल्हापूर दक्षिण- रुतुराज पाटील (कॉंग्रेस)
करवीर- पी.एन.पाटील (कॉंग्रेस)
कोल्हापूर उत्तर- चंद्रकांत जाधव (कॉंग्रेस)
शाहूवाडी- विनय कोरे (जनसुराज्य)
हातकणंगले-राजू आवळे (कॉंग्रेस)
इचलकरंजी- प्रकाशआण्णा आवडे (अपक्ष)
शिरोळ- राजेंद्र पाटील (अपक्ष)
मिरज- सुरेश खाडे (भाजप)
सांगली- सुधीर गाडगीळ (भाजप)
इस्लामपूर- जयंत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
शिराळा- मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)
पलूस-कडेगाव- विश्वजित कदम (काँग्रेस)
खानापूर- अनिलभाऊ बाबर (शिवसेना)
तासगाव-कवठे महांकाळ- सुमन पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
जत- विक्रम सावंत (काँग्रेस)
पाहा आतापर्यंतच्या अपडेटस्
४.०२ सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव; श्रीनिवास पाटील विजयी
४.०० इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील सातव्यांदा निवडून आले आहेत.
३.४६ इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा धक्का
१.३१ पुरंदर मतदारसंघातून विजय शिवतारे पराभूत
१.०८ खेड-आळंदी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते-पाटील विजयी
१.०८ कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील १४५०० मतांनी आघाडीवर
१.०८ पारनेरमधून काँग्रेसचे निलेश लंके विजयी
१.०८ पुण्याच्या आंबेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील विजयी
१.०८ तासगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुमन पाटील विजयी
१२.४२ कसबा मतदारसंघातून भाजपच्या मुक्ता टिळक विजयी
११.४२ संगमनेरमधून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात विजयी
११.४२ पलूस-कडेगाव मतदारसंघातून विश्वजित कदम १,३५,२५८ मतांनी आघाडीवर
११.४१ कोथरूडमधून १३व्या फेरीअखेर चंद्रकांत पाटील यांच्याकडे अवघ्या ३ हजार मतांची आघाडी
११.४१ सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे पिछाडीवर
११.४१ शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखे-पाटील दहाव्या फेरीअखेर ४५,६१५ मतांनी आघाडीवर
११.४० संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना आठव्या फेरीअखेर १९ हजार मतांची आघाडी
११.४०पारनेरमधून चौदाव्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश लंके यांना २८ हजार मतांची आघाडी
११.४० इस्लामपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील १४ हजार मतांनी आघाडीवर
११.४० पलूस -कडेगावमधून विश्वजित कदम ७६ हजार मतांनी आघाडीवर
११. २३ : इंदापूरमध्ये भाजपला धक्का; हर्षवर्धन पाटील ४०२८ मतांनी आघाडीवर, राष्ट्रवादीच्या दत्तात्रेय भरणे यांना ४०६८२ मते
११. २२ : तुळजापूरमधून राणा जगजितसिंह पाटील २० हजार मतांनी आघाडीवर
११. १५ : तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुमन आर.आर. पाटील ५२९११ मतांनी आघाडीवर
११. १५ : करमाळा विधानसभा मतदारसंघात रश्मी बागल पिछाडीवर; अपक्ष नारायण पाटील आघाडीवर
११. १५ : बारामती मतदारसंघातून अजित पवार ७२ हजार मतांनी आघाडीवर
११. १५ : तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुमन आर.आर. पाटील ५२९११ मतांनी आघाडीवर
११. १५ : करमाळा विधानसभा मतदारसंघात रश्मी बागल पिछाडीवर; अपक्ष नारायण पाटील आघाडीवर
१०.४५: अहमदनगर: कर्जत-जामखेडमधून राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी मोठी आघाडी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष
१०.४४: कसब्यातून मुक्ता टिळक यांना २० हजारांची आघाडी. टिळक यांना ३१,२७३ तर काँग्रेसचे अरविंद शिंदे यांना १२,९०४ मते
१०.४२: जुन्नरमध्ये नवव्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेस ५०१३ मतांनी आघाडीवर
१०.४१: इंदापूरमध्ये भाजपला धक्का; राष्ट्रवादीचे दत्तात्रेय भरणे ६०४ मतांनी आघाडीवर
१०.४१: उदयनराजे भोसले ३० मतांनी पिछाडीवर
१०.४०: सातार विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रसिंह राजे २०६९ मतांनी आघाडीवर
१०.३१: बारामतीमधून अजित पवार ५० हजार मतांनी आघाडीवर
१०.३०: कोथरूडमधून चंद्रकांत पाटील ११ हजार मतांनी आघाडीवर
१०.२५: मावळमधून बाळा भेगडे पिछाडीवर, राष्ट्रवादीचे सुनिल शेळके २७०७७ मतांनी आघाडीवर
१०.२५: कर्जत-जामखेडमध्ये सातव्या फेरीअखेर रोहित पवार १० हजार मतांनी आघाडीवर
१०.२४: बारामती मतदारसंघातून अजित पवार ४३१९१ मतांनी आघाडीवर
१०.२३: भोर मतदारसंघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे ४९ मतांनी आघाडीवर
१०.२१: पलूस-कडेगाव मतदारसंघात काँग्रसचे विश्वजित कदम ३२ हजार मतांनी आघाडीवर, शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा नोटाला जास्त मतदान
१०.२०: सोलापूर-करमाळा : पाचव्या फेरी अखेर... अपक्ष नारायण पाटील : १५१०१ शिवसेना. रश्मी बागल। : १४३२८ अपक्ष- संजयमामा शिंदे : १०३५४
१०.१९: सोलापूर-माळशिरस विधानसभा ५ व्या फेरीचा निकाल - उत्तमराव जानकर - ५७४२ राम सातपुते - ३०८६ उत्तमराव जानकर ५ व्या फेरी अखेर ८३७४ मतांनी आघाडीवर
१०.१२: उदयनराजे भोसले २० हजार मतांनी पिछाडीवर
१०.१२: चिंचवड मतदारसंघात भाजपचे लक्ष्मण जगताप ३५४७ मतांनी आघाडीवर
१०.१०: पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात मतमोजणी थांबली; ईव्हीएम सील नसल्याचा काँग्रेसचा आरोप
१०.०५: भोसरी मतदारसंघातून भाजपचे महेश लांडगे १३७१९ मतांनी आघाडीवर
१०.०४: तिसऱ्या फेरीअखेर दौंड मतदारसंघात भाजपचे राहुल कुल ७८५२ मतांनी आघाडीवर
१०.०४: करवीर मतदारसंघातून चंद्रदीप नरके ५ हजार मतांनी आघाडीवर
९,५८: उदयनराजे भोसले १४७७२ मतांनी पिछाडीवर
९.५०: सांगलीच्या तासगाव मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुमन पाटील १७५४६ मतांनी आघाडीवर
९.४९: भोर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे ७७९ मतांनी आघाडीवर
९.४७: कागलमध्ये तिसऱ्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ ७०० मतांनी आघाडीवर
९.४६: चिंचडव मतदारसंघातून भाजपच्या लक्ष्मण जगतापांची १८०० मतांची आघाडी
९.४५: सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले १० हजार मतांनी पिछाडीवर
९.४१: बारामती मतदारसंघात तिसऱ्या फेरीअखेर अजित पवार यांना २१८५५ आणि गोपीचंद पडाळकर यांना३४४० मते
९.४१: मावळमध्ये राज्यमंत्री बाळा भेगडे साडेदहा हजार मतांना पिछाडीवर
९.४१: सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादी सहा जागांवर आघाडीवर
९.४०: कोल्हापुरात शिवसेना पाच जागांवर पिछाडीवर
९.३९: सोलापूरच्या करमाळा मतदारसंघातून शिवसेनेच्या रश्मी बागल १९६७ मतांनी आघाडीवर
९.३८: सोलापूरच्या माढा मतदारसंघातून बबनराव शिंदे २० हजार मतांनी आघाडीवर
९.३७: करवीर मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रदीप नरके आघाडीवर
९.३६: कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण १६१७ मतांनी आघाडीवर
९.३३: इंदापूरमध्ये भाजपचे हर्षवर्धन पाटील १०५४ मतांनी आघाडीवर
९.३२: अहमदनगर : श्रीगोंदा मतदारसंघात भाजपचे बबनराव पाचपुते आघाडीवर
९.३१: मावळ : पहिल्या फेरीत राज्यमंत्री बाळा भेगडे पिछाडीवर, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके १९९७ मतांनी आघाडीवर
९.२७: आंबेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील आघाडीवर
९.२२: बारामतीमध्ये दुसऱ्या फेरीअखेर अजित पवार १२२२९ मतांनी आघाडीवर
९.२१: सोलापूरच्या करमाळा मतदारसंघातून शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील आघाडीवर
९.२१: सोलापूर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे पिछाडीवर
९.१९: कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार आघाडीवर; राम शिंदे पिछाडीवर
९.१८: सांगलीच्या तासगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुमनताई आर.आर. पाटील २५ हजार मतांनी आघाडीवर
९.१७: कराड उत्तर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील ३०५ मतांनी आघाडीवर
९.१६: इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील ५ हजार ५०० मतांनी आघाडीवर
९.१५: पुण्याच्या भोर मतदारसंघात काँग्रेसचे संग्राम थोपटे १७१ मतांनी आघाडीवर
९.०७: सांगली जिल्ह्यातील ८ मतदारसंघांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस ३ , भाजप आणि शिवसेना प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर
९.०६: उदयनराजे भोसले १०८९ मतांनी पिछाडीवर
९.०६: कोल्हापूर दक्षिणध्ये काँग्रेसचे ऋतुराज पाटील आघाडीवर
९.०५: पलूस-कडेगाव मतदारसंघातून काँग्रेसचे विश्वजित कदम आघाडीवर
९.०४: माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे बबनराव शिंदे ५१०६ मतांनी आघाडीवर
९.०३: पंढरपूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे भारत भालके १८०० मतांनी आघाडीवर
९.०२: पुरंदर-हवेली मतदारसंघातून शिवसेनेचे विजय शिवतारे ११२७ मतांनी आघाडीवर
८.५१: पहिल्या फेरीनंतर रोहित पवार ३ हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर
८.४७: बारामतीमधून अजित पवार आघाडीवर
८.४६: आंबेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील ३१९८ मतांनी आघाडीवर
८.४५: खानापूर मतदारसंघातून शिवसेनेचे अनिल बाबर ९६ मतांनी आघाडीवर
८.४० :शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर
८.३८ : इचलकरंजीमधून भाजपचे सुरेश हाळवणकर पिछाडीवर
८.३७ : मिरजमध्ये भाजपचे सुरेश खाडे ३७९४ मतांनी आघाडीवर
८.३६ : चंदगड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे राजेश पाटील आघाडीवर
८.३५ : कसबा मतदारसंघात भाजपच्या मुक्ता टिळक आघाडीवर
८.२८ : कोथरूडमधून भाजपचे चंद्रकांत पाटील आघाडीवर
८.२७ : सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन आर.आर. पाटील पहिल्या फेरीत पाच हजारांनी आघाडीवर
८.२६ : जत मतदारसंघात काँग्रेसचे विक्रम सावंत आघाडीवर
८.२५ : पुण्याच्या शिवाजीनगर मतदारसंघातून भाजपचे अनिल शिरोळे आघाडीवर
८.२५ : सांगोला मतदरासंघातून शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख आघाडीवर
८.२३ : भोसरीमध्ये भाजपचे महेश लांडगे पिछाडीवर
८.२२ :कर्जत-जामखेडमधून रोहित पवार पिछाडीवर
८.२० : चिंचवडमधून लक्ष्मण जगताप आघाडीवर
८.०५: साताऱ्यात पोस्टल मतमोजणीला सुरुवात
८.०४: कोल्हापूरात पोस्टल मतमोजणीला सुरुवात
८.०१: पोस्टल मतजोणीनंतर दोन मतदारसंघात महायुती आघाडीवर
८.००: राज्यातील मतमोजणीला सुरुवात
७.४८: पुणे शहरात विजयी मिरवणूक काढण्यास मनाई; कलम १४४ लागू
७.१४: राज्यातील पहिला निकाल कसबा मतदारसंघातून
७.१३: थोड्याचवेळात मतमोजणीला सुरुवात
७.१२: सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा मतदारसंघाचे निकाल १२ तास उशीराने
पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यातील जोरदार शाब्दिक कुस्तीमुळे यंदा पश्चिम महाराष्ट्रातील लढतींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सहकार चळवळीचा केंद्रबिंदू आणि एकेकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेचे ७० मतदारसंघ येतात. गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपने येथील काँग्रेस-राष्ट्रवादीची मक्तेदारी पद्धतशीरपणे मोडून काढली आहे. तसेच निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे यंदाची निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी अस्तित्त्वाची लढाई आहे.
पश्चिम महाराष्ट्रात यंदा अनेक लक्षवेधी लढती पाहायला मिळत आहेत. यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक हे आकर्षणाचे केंद्र आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस उदयनराजे भोसले यांच्या मक्तेदारीला शह देणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल. याशिवाय, पुणे जिल्ह्यातील कोथरूड मतदारसंघातील लढत ही सुरूवातीपासूनच चर्चेचा विषय आहे. कोथरूडमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे रिंगणात आहे. एरवी हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, स्थानिकांची नाराजी आणि विरोधकांनी एकमताने मनसेच्या उमेदवाराला दिलेल्या पाठिंब्यामुळे कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांसमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे.
याशिवाय, कर्जत-जामखेड मतदारसंघातील राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यातील चुरशीच्या लढतीकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांनी जातीने रोहित पवार यांच्या प्रचारात लक्ष घातले होते. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील राम शिंदे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते.
तुमच्या भागाचा निकाल पाहा एकाच क्लिकवर
LIVE निकाल महाराष्ट्राचा : मुंबई
LIVE निकाल महाराष्ट्राचा : कोकण
LIVE निकाल महाराष्ट्राचा : मराठवाडा
LIVE निकाल महाराष्ट्राचा : विदर्भ
LIVE निकाल महाराष्ट्राचा : पश्चिम महाराष्ट्र
LIVE निकाल महाराष्ट्राचा : उत्तर महाराष्ट्र
विधानसभेच्या एकूण ७० जागा असलेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले होते. जिल्ह्यातील १० पैकी सहा मतदारसंघांमध्ये गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र, यंदा काही मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली आहे. या बंडखोरांना भाजपकडून छुपी रसद पुरवण्यात आली होती. त्यामुळे शिवसेनेला दगाफटका होण्याची शक्यता आहे.
मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील एकूण चित्र पाहता ही देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यातील थेट लढाई असल्याचे मानले जात आहे. याठिकाणी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासारखे स्टार प्रचारक मैदानात उतरवले होते. मात्र, साताऱ्यात शरद पवारांनी भर पावसात घेतलेल्या सभेने ऐन मतदानाच्या आधी वातावरण फिरवले होते. त्यामुळे याचे प्रतिबिंब निकालात पडणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.