पुणे : महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला अधिकार्‍याकडे मुख्य आरोग्य निरीक्षकाने वेळोवेळी व प्रत्यक्ष भेटून शरीरसुखाची मागणी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात महिला अधिकार्‍याने फिर्याद दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी मुख्य आरोग्य निरीक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात केला आहे. बाळासाहेब साबळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.


याबाबत पीडित महिलेला जून २०१८ ते २४ ऑक्टोबर २०१८ दरम्यान साबळे याने वेळोवेळी फोन करून व प्रत्यक्ष भेटून शरीरसुखाची मागणी केली. 


२४ ऑक्टोबर रोजी महिलेला त्याने कामानिमित्त कोरेगाव पार्क येथे बोलाविले आणि तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.


त्यास पीडित महिलेने नकार दिल्यावर त्याने त्यांचा हात पकडून त्रास दिला. त्यानंतर पीडित महिलेने पतीसह पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. 


गुन्ह्याचा पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत. या प्रकरामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.