महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका होणार! भाजपचा बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार
Maharashtra politics : भाजपला मोठा धक्का बसणार आहे. एक बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. लवकरच पक्ष प्रवेश होणार आहे.
PuneSanjay Kakade : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका होणार आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यापाठोपाठ भाजपचा आणखी एक बडा पक्ष सोडणार आहे. भाजपच्या या बड्या नेत्याचे नाव संजय काकडे आहे. संजय काकडे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. संजय काकडे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. सजंय काकडे हे भाजपचे माजी राज्यसभा खासदार आहेत. पक्षाकडून 10 वर्षांत काहीच मिळालं नसल्याची तक्रार संजय काकडे यांनी केली आहे.
हे देखील वाचा...महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस! सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये फाईलने चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?
भाजपकडून फक्त वापर झाल्याचा आरो देखील त्यांनी केला आहे. समरजित घाटगे, हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर संजय काकडे यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी अखेर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची तुतारी हाती घेतलीय. भाजपमध्ये जाऊन गेल्या दहा वर्षात फारसं काही हाती न लागलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतलाय. शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांच्या हातात तुतारी देतानाच इंदापूरची उमेदवारीही जाहीर केलीय. विधानसभेला दत्तामामा भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील या सामन्याचीच एकप्रकारे घोषणा झालीय.
हे देखील वाचा... पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव माहित आहे का?
देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक असलेल्या समरजित घाटगे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यामुळे कोल्हापुरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या हातात तुतारी दिल्यानंतर आता फलटणमध्ये अजित पवारांना धक्का देण्याची तयारी शरद पवारांनी केलीय. त्यासाठी 14 ऑक्टोबरचा मुहूर्तही काढण्यात आलाय. विधान परिषदेचे माजी सभापती दिग्गज नेते रामराजे नाईक निंबाळकर हे तुतारी घेण्याची शक्यता आहे.