Supriya Sule : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका केव्हाही घोषीत होऊ शकतात. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस निर्माण करणारी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांच्याच कारमधुन एक नेता प्रवास करत होता. मात्र, आपली ओळख उघड होऊ नये यासाठी ही व्यक्तीने फाईलने चेहरा लपवण्याचा प्रयत्न केलाय. चेहरा लपवण्याचा प्रयत्न करणा तो नेता कोण? याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांच्या रांगा लागल्यात. पुण्यातल्या शरद पवारांच्या मोदीबागेत इच्छुकांची रोज गर्दी पाहायला मिळत आहे. सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणेच पवारांच्या घरी अनेक मोठे नेते तिकीटासाठी भेटतायेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांनीही शरद पवारांची भेट घेतलीय. तसेच संदीप क्षीरसागर हेही शरद पवारांच्या भेटीला आले होते. मोदीबागेत शरद पवारांना भेटायला आलेल्या एका नेत्याने आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये मागच्या सीटवर बसलेला आणि कॅमेऱ्यात चेहरा दिसू नये म्हणून चेहऱ्यासमोर फाईल पकडलेला तो नेता कोण याविषयी सध्या चर्चा सुरू आहे. मंगळवारी सकाळी सुप्रिया सुळे त्यांच्या पुण्यातील मोदीबाग निवासस्थानातून पडत असताना एक व्यक्ती त्यांच्या कारमध्ये बसलेली होती. मीडियाचे कॅमेरे या व्यक्तीकडे वळताच तिनं स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीने फाईलने चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला.
सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांकडे बाहेरून येणाऱ्या इच्छुकांची रीघ लागली आहे. काही लोक दोन्ही दगडांवर हात ठेवून असतात. मात्र, त्यासाठी त्यांना प्रचंड गुप्तता पाळावी लागते. राजकीय नुकसान टाळण्यासाठी स्वतःच बिंग फुटू नये याची ते काळजी घेतात. सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये बसलेली व्यक्ती देखील अशांपैकीच एक असावी असं बोललं जात आहे.