पुणेकर महिलेनं अख्खा ब्रश गिळला! जीभ साफ करताना...; तिला पाहून डॉक्टरही थक्क
Pune Woman Swallows Toothbrush : जीभ साफ करताना पुणेकर महिलेनं चक्क गिळला अख्खा ब्रश
Pune Woman Swallows Toothbrush : कधी-कधी आपण अशा काही गोष्टी ऐकतो ज्यावर आपल्याला विश्वास बसत नाही. त्यापैकी काही गोष्टी या अनेकदा लहाण मुलांकडून होतात. लहाण मुलं अनेकदा खेळता खेळता काही गोष्टी उदाहरण, कॉइन, रबर, पेनाचं टोपण अशा अनेक गोष्टी या गिळताना दिसतात. पण जर हेच कोणत्या 40 वर्षाच्या महिलेनं केलं असं तुम्ही ऐकलं तर त्यावर तुम्हाला विश्वास बसेल का? तर नाही कारण असं काही कोणत्या महिलेकडून चुकूनही होईल याची कोणी कल्पनाही केलेली नसते. मात्र, हे सत्य आहे. एका 40 वर्षाच्या महिलेनं अशी वस्तू गिळली आहे जे ऐकूण तुम्हाला फक्त आश्चर्य होणार नाही तर धक्काही बसेल. या 40 वर्षांच्या महिलेनं चक्क टूथब्रश गिळला आहे.
ही महिला ब्रश करत असताना जीभ साफ करण्यासाठी 20 सेंटीमीटरचा ब्रश वापरत होती. या दरम्यान, चुकून तिनं ब्रश गिळला. एका 40 वर्षाच्या महिलेनं ब्रश गिळल्याची घटना ऐकल्यानंतर डॉक्टर आणि मेडिकल डिपार्टमेंटमध्ये देखील गोंधळ उडाला आहे. ब्रश घशात अडकल्यामुळे तिला श्वास घेता येत नसल्याने धाप लागल्यासारखं झाल्याने तिच्या घरातील सारेच लोक घाबरले. त्यांनी तातडीने तिला डि वाय पाटील रुग्णालयात दाखल केलं.
डॉक्टरही थक्क
गॅस्ट्रोएन्टरलॉजिस्ट डॉक्टर अभिजीत कराड 'पुणे मिरर'शी बोलताना म्हणाले, 'महिला एक ब्रश कसा गिळू शकते ही घटना सुरुवातीला हे अशक्य असल्याचं वाटत होती.' जगभरात ब्रश गिळण्याची घटना ही क्वचित कुठे पाहायला मिळते. तर संपूर्ण जगात याचे 30 पेक्षा ही कमी रुग्ण पाहायला मिळाले.
कधी आणि कशी होते अशी घटना?
पुढे डॉक्टर अभिजीत म्हणाले, 'ज्या लोकांचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं त्यांच्यासोबत अशी काही घटना होण्याची दाट शक्यता असते. ज्यात सिजोफ्रेनिया, बुलिमिया किंवा एनॉरेक्सिया सारख्या आजारानं त्रस्त असलेले लोक असतात. काही दिवसांनंतर छोटी वस्तू गिळल्याचं प्रकरण समोर येतं. पण संपूर्ण राज्याच एक 20 सेंटीमीटरचा ब्रश गिळण्याची घटना ही पहिलीच असावी.'
हेही वाचा : नागा चैतन्यासोबत घटस्फोटानंतर समांथा रुथ प्रभूनं आई होण्यावर केलं मोठं वक्तव्य म्हणाली, 'मला...'
2013 मध्ये हरियाणातील 35 वर्षीय एका पुरुषानं टुथब्रश गिळला होता. लक्षवेधी गोष्ट म्हणजे त्याच्या 2 महिन्यानंतर तो डॉक्टरांकडे गेला आणि जेव्हा क्ष-किरण केल्यानंतर त्याच्या पोटात काही वस्तू असल्याचं दिसून आलं.