Raj Thackerays video call: आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यभरात दौरे सुरु केले. मराठवाडा दौऱ्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी  राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकल्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराला ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर दिलंय.  उद्धव ठाकरेंच्या ठाणे मेळाव्यात मनसे कार्यकर्त्यांनी राडा घातला. मेळावा आटपून निघाल्यानंतरही मनसे कार्यकर्त्यांचा राडा सुरुच होता. ठाकरेंच्या ताफ्यासमोर महिला मनसैनिकांनी घोषणाबाजी केली. राड्यानंतर ठाकरेंच्या महिला कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरुच होती. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राडा घालणाऱ्यांना व्हिडीओ कॉल केला. यामुळे आनंदी झालेल्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात मनसे कार्यकर्त्यांनी राडा घातला. यावेळी ठाकरेंच्या ताफ्यासमोर नारळ, बांगड्या आणि टोमॅटो,  शेण फेकून मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार राडा घातला. यानंतर राडा घालणा-या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पण राज ठाकरेंचा व्हिडीओ कॉल आल्यानंतर मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाच वातावरण होतं. त्यांनी मिळून एकच जल्लोष केला.


नेमका प्रकार काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या. याचा प्रचंड राग मनसैनिकांच्या मनात होता. दरम्यान माझ्या नादी लागू नका. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत. माझं मोहोळ उठलं तर सभाही होऊ देणार नाहीत, असा इशारा राज ठाकरेंनी ठाकरे गटाला दिला होता. यानंतर मनसे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. ठाण्यात ठाकरेंच्या मेळाव्यातील संधीचा त्यांनी फायदा घेतला. रात्री साडे आठच्या सुमारास उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महत्वाचे नेते रंगायतन सभागृहाच्या दिशेने चालले होते. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यासमोर बांगड्या, नारळ, टोमॅटो फेकले.


'पुन्हा राज ठाकरेंच्या वाट्याला गेलात तर...', अविनाश जाधवांचा ठाकरे गटाला थेट इशारा


काय म्हणाले मुख्यमंत्री?


शिंदेंच्या ठाण्यात मनसेच्या राड्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला. राडा घालणाऱ्या मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.दरम्यान ही अॅक्शनला रिअॅक्शन असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. दरम्यान काहीजणांना ताब्यात घेऊन पुन्हा सोडण्यात आलंय तर काहीजण अद्यापही फरार आहेत. 


मनसेला खुलं आव्हान 


ठाण्यातील मनसेच्या राड्यानंतर ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मनसेला खुलं आव्हान दिलं. आपल्या भागात तर कुत्राही वाघ असतो, मात्र 'इलाका तुम्हारा और धमाका हमारा' यात खरी मजा आहे असं खुलं आव्हानच, सुषमा अंधारेंनी मनसेला दिलं. एकनाथ शिंदेंची मदत मिळू शकेल अशा सुरक्षित ठाण्यात मनसे आक्रमक झाली, अशा शब्दांत त्यांनी मनसेला डिवचलं.


ठाकरेंची शिंदेंवर टीका 


उद्धव ठाकरे यांचा ठाण्यात मेळावा पार पडला यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका केली.हे नाग नाही मांडुळ असल्याचा घणाघात ठाकरेंनी यावेळी केला. विधानसभेला आपली लढाई महाराष्ट्रद्वेष्ट्यांसोबत होणार आहे. ही लढाई ईर्षेनं लढायची आहे असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. या निवडणुकीत तोतयांची वळवळ पूर्ण थांबवायची असल्याचं ते म्हणाले. लाडकी बहिण योजनेवरून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय...पंधराशे रुपये कसले देता...पंधरा लाख देणार होता त्याचं काय झालं....वरचे शून्य कुठे गेले? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय.