श्रीकांत राऊत, झी मीडियाय यवतमाळ : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या आवारात उघड्यावर झाली. धक्कादायक म्हणजे या महिलने स्वत:च बाळाची नाळ तोडली. या घटनेने संपूर्ण सर्वत्र खळबळ उडाली असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पारधी समाजातील एका गर्भवती महिलेला दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 3 मध्ये ही महिला दाखल होती. या महिलेला असह्य प्रसूत वेदना होत होत्या. तिला रक्ताची गरज असल्याने तिच्या पतीला खाजगी रक्तपेढीसाठी रक्त आणण्यासाठी पाठवण्यात आलं. इकडे कोणत्याच डॉक्टरने तिच्याकडे लक्ष ने दिल्याने ती महिला रुग्णालयाबाहेर पडली आणि रुग्णालयाच्या आवारात उघड्यावरच तिची प्रसूती झाली. 


धक्कादायक म्हणजे त्या महिलेने स्वत:च बाळाची नाळ तोडली. प्रसूतीनंतर ही महिला पतीसह गावी नेर तालुक्यातील झोम्बाडी येथे निघून गेली होती. दरम्यान, ती महिला वॉर्डातून बाहेर आली कशी? खाजगी रक्तपेढीतून रक्त आणण्यास का सांगण्यात आलं? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे राहिले आहेत. याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.


याप्रकरणी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी आम्ही त्या महिलेला रुग्णालयातून हकललं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. ती महिला स्वत: वॉर्डातून बाहेर पडल्याचं त्यांनी सांगितलं.