Beed Maratha Protest :   मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यां;s उपोषण आंदोलन सुरू आहे. जरांगे यांचे आंदोलन सुरु असल्यापासून  राज्यात काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. बीडमध्ये (Beed) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) यांच्या बंगल्यावर दगडफेक आणि आवारातील वाहनांना आग लावण्याची घटना घडली होती. बीडमधील जाळपोळ प्रकरणात अत्यंत धक्कादायक अपडेट सोमर आली आहे. 42 पैकी 14 संशयित बिगरमराठे होते. तसेच हल्ल्याचा कट पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे,. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या घरावर हल्ला आणि जाळपोळ करणारे बिगरमराठे होते, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय. याप्रकरणी अटक केलेल्या 21 आरोपींपैकी 8 आरोपी बिगरमराठा समाजातले आहेत, असा आरोप सोळुंकेंनी केलाय. त्यामुळं हल्ल्याचा कट पूर्वनियोजत असल्याच्या त्यांच्या दाव्याला पुष्टी मिळालीय मनोज जरांगेंच्या विरोधात कथित वक्तव्य केल्याच्या रागातून सोळुंकेंच घर पेटवून देण्यात आलं होतं.


नेमकं काय घडलं होतं?


मराठा आरक्षण आंदोलकांच्या नावाखाली 30 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये जाळपोळ करण्यात आली. या जाळपोळीत 42 संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे यापैकी 30 टक्के म्हणजे 14 हल्लेखोर हे बिगरमराठा समाजातील असल्याची माहिती पोलिस दलातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. यावरून हा हल्ला समाजकंटकांनी केला असल्याच्या आमदार संदीप क्षीरसागर यांच्या संशयाला पुष्टी मिळते. 


सीसीटीव्ही फुटेजनुसार काही हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधून आले होते. तसेच अनेकांच्या पाठीवर सॅक होत्या. त्यात दगड, पेट्रोलच्या बाटल्या असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. विशेष म्हणजे सर्व हल्लेखोर 18 ते 30 या वयोगटातील होते. हल्लेखोरांचा हा जमाव एका ठिकाणाहून आलेला नव्हता. सुरुवातीला 150 ते 200 तरुण यात सहभागी होते. तोडफोड, जाळपोळ करत माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या घराजवळ जमाव आला तेव्हा तरुणांची संख्या वाढली. शिक्षक आणि काही कर्मचारी त्यात आहेत. 21 लोकांना अटक झाली. त्यात 8 आरोपी मराठा शिवाय इतर समाजाचे आहेत असा सोळुंखे यांचा आरोप आहे. 


हिंसाचार आणि दगडफेकीमुळे ST बस डेपोचे मोठ नुकसान 


बीड जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचार आणि दगडफेकी मध्ये सर्वात मोठं नुकसान झालं ते बस डेपोच बसडेपोमधील उभा असलेल्या बसेसची तोडफोड झाल्यामुळे अजूनही बससेवा बंद आहे. लातूर आणि इतर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेस देखील बंद आहेत त्यामुळं प्रवाश्यांचे हाल होत आहेत.