Maharashtra Political News : राज्यातील बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result 2022) निकाल काही वेळातच जाहीर होईल. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ( Maharashtra Political News Update) विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. पहिल्या फेरीपासून ते 16 व्या फेरीपर्यंत ऋतुजा लटके यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या  राजकारणात गेल्या तीन महिन्यांपासून मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमुळे वातावरण तापलं होते. अखेर त्याच पोटनिवडणुकीचा निकाल आज समोर आला आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी पहिल्या फेरीपासून चांगली आघाडी घेतली होती. दरम्यान, या निवडणुकीदरम्यान  भाजपने आपला उमेदवार मागे घेतला होता. भाजपने उमेदवार मागे घेतल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला होता. तरीही भाजप वगळता इतर उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली नाही. मात्र, अपक्ष उमेदवारांना टक्कर देता आली नाही. मात्र, नोटाचा सामना या निवडणुकीत पाहायला मिळाला. 'नोटा'ला 10 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. ऋतुजा लटके यांना मतमोजणीच्या 17व्या फेरी अंती 61956  मतं मिळाली आहेत. तर 'नोटा'ला 12166 मतं मिळाली.


Live Updates : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल, पाहा कोणाला किती मतं ?


एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटाची ही पहिलीच निवडणूक. त्यामुळे ठाकरेंसाठी हा पहिलाच निकाल असेल. मात्र, पहिला फेरीपासून आघाडी घेतलेल्या ऋतुजा लटके यांचा सामना हा 'नोटा'शी असल्याचे दिसून येत आहे. अपक्ष उमेदवारांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान, भाजपनं माघार घेतल्यानं ऋतुजा लटकेंसमोर मोठं आव्हान नव्हतं. त्यांच्यासमोर इतर 6 अपक्ष उमेदवार उभे होते. त्यामुळे ऋतुजा लटकेंना किती मतं पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांसह मोठी बंडखोरी केल्याने शिवसेनेत उभी फुट पडली. या संकट काळात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढील आव्हान वाढलं होते. त्यातच शिंदे गटाने भाजपला साथ देताना आपला उमेदवार उभा केला नव्हता. विशेष म्हणजे ठाकरे गटाला डिवचण्यासाठी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून आणि शिंदे गटाकडून रणनीती आखली जात होती. मात्र, शिवसेनेला चांगला पाठिंबा मिळत असल्याने या निवडणुकीतून भाजपने माघार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


काही महिन्यांपूर्वी अंधेरी पूर्वचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचे निधन झालं होते. त्यामुळे ती जागा रिक्त झाली होती. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर पुढच्या सहा महिन्यात निवडणूक घेणे गरजेचं असते. त्यानुसार अंधेरी पूर्व पोटनिवडणूक घेण्यात आली.