Mumbai New Year Guidlines : मोठी बातमी; मुंबईत कलम 144 लागू, कसा साजरा होणार थर्टीफर्स्ट?
Mumbai New Year Guidlines : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाची सुरुवात अतिशय जल्लोषात आणि दिमाखात करण्यासाठी सध्या सर्वजण सज्ज झाले आहेत (year end 2022).
Mumbai New Year Guidlines : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाची सुरुवात अतिशय जल्लोषात आणि दिमाखात करण्यासाठी सध्या सर्वजण सज्ज झाले आहेत (New Year 2023 Celebration). अनेकांनी पर्यटनस्थळांवर गर्दी केली आहे, तर काहींनी मुंबईत (Mumbai new year party) येत या शहरातूनच 2022 या वर्षाला निरोप देण्याचं ठरवलं आहे. तुम्हीही थर्टीफर्स्ट म्हणजेच 31 डिसेंबर 2022 ला मुंबईत असाल, तर काही नियमांचं पालन मात्र नक्की करा. कारण, मुंबई पोलिसांकडून (Mumbai police) शहरात कलम 144 (Section 144) लागू करण्यात आलं आहे. त्यामुळं आता थर्टीफर्स्ट कसा साजरा करायचा असाच प्रश्न या शहरातील नागरिकांना पडू लागला आहे.
का घेतला हा निर्णय?
मुंबई पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार 31 डिसेंबर 2022 ते 29 जानेवारी 2023 पर्यंत हे नियम लागू असणार आहेत. यामध्ये प्रामुख्यानं फ्लाईंग कंदिल वापरणं, विक्री करणं आणि ते सोबत बाळगणं या मानवी जीवनाला धोका उदभवू शकतो. किंबहुना शहरातील शांतता आणि सुव्यवस्थाही भंग होऊ शकते ज्यामुळं सावधगिरी बाळगत कलम 144 मधील अधिकारान्वये त्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं तुम्हीही जर year ending ला आकाशकंदिर सोडण्यच्या बेतात असाल तर आताच हा प्लान विसरून जा.
मुंबईवर कोरोनाचं संकट (Mumbai Corona updates)
एकिकडे नव्या वर्षाचा स्वागताचा उत्साह असतानाच दुसरीकडे मात्र राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे. चीनमध्ये आलेल्या संकटाचे पडसाद आता महाराष्ट्र आणि मुंबईतही उमटू लागले आहेत. वर्षाच्या अखेरच्या दिवशी मुंबईत बरीच गर्दी होते, त्यातच कोरोनाचा संसर्ग फोफावण्याची भीती असल्यामुळं शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
जमावबंदीच्या आदेशांनुसार मुंबईत कोणत्याही मोकळ्या किंवा बंद ठिकाणावर पार्टी करण्यास मनाई असेल. यामध्ये रेस्तराँ, हॉटेल, बार, रिसॉर्ट यांचा समावेश आहे. सदरील नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कलम 144 अन्वये कारवाई करण्यात येईल.
हेसुद्धा वाचा : New Year 2023 : शिस्तीत थर्टी फस्ट साजरा करा; रस्त्यात धांगडधिंगा, आरडाओरड केला तर पोलिस करेक्ट कार्यक्रम करतील
गेल्या काही काळात मुंबईत कोरोनाचे 2500 हून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. रुग्णांमध्ये 82 टक्क्यांनी झपाट्यानं झालेली वाढ पाहता आता आरोग्य यंत्रणांनीही युद्धपातळीवर कोरोनाशी लढण्यासाठी काही पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. तज्ज्ञांच्या मते कोरोनाच्या आणखी एका लाटेची सुरुवात मुंबईत झाली आहे, त्यामुळं आता अतिउत्साहाच्या भरात कोरोना संसर्गाचंही भान असूद्या असंच आवाहन मुंबईकरांना करण्यात येत आहे.