New Year 2023 : शिस्तीत थर्टी फस्ट साजरा करा; रस्त्यात धांगडधिंगा, आरडाओरड केला तर पोलिस करेक्ट कार्यक्रम करतील

 थर्टी फस्टच्या दिवशी कोणातही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा तगडा बंदोबस्त असतात. थर्टी फस्ट दिवशी रस्त्यात धांगडधिंगा, आरडाओरडी करणाऱ्यांचा पोलिस करेक्ट कार्यक्रम करणार आहेत(Police security). थर्टी फस्ट दिवशी मुंबईसह महाराष्ट्रात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.

Updated: Dec 30, 2022, 10:31 AM IST
New Year 2023 : शिस्तीत थर्टी फस्ट साजरा करा; रस्त्यात धांगडधिंगा, आरडाओरड केला तर पोलिस करेक्ट कार्यक्रम करतील title=

New Year 2023 Celebration Guidelines : 2022 वर्ष संपायला आता अवघे काहीच तास शिल्लक राहिले आहेत. नव वर्षाचे स्वागत जंगी स्वागत करण्यासाठी थर्टी फस्टच्या पार्टीचा (Thirty First Celebration) बेत आखला जातो. मात्र, बऱ्याचदा अशा पार्ट्यांमध्ये रंगाचा बेरंग होतो. यामुळेच थर्टी फस्टच्या दिवशी कोणातही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा तगडा बंदोबस्त असतात. थर्टी फस्ट दिवशी रस्त्यात धांगडधिंगा, आरडाओरडी करणाऱ्यांचा पोलिस करेक्ट कार्यक्रम करणार आहेत(Police security). थर्टी फस्ट दिवशी मुंबईसह महाराष्ट्रात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.

थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनसाठी मुंबई सज्ज 

थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनसाठी मुंबई सज्ज झाली आहे. सेलिब्रेशनसाठी मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. महिला आणि लहान मुलांसाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे. मुंबईतील सर्व घडामोडींवर सीसीटीव्ही कॅमेरांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. तसंच 100 पेक्षा जास्त ठिकाणी नाकाबंदी असणार आहे. थर्टीफर्स्टच्या तयारीसंदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी माहिती दिली.

मद्यपी चालकांविरुद्ध तीव्र मोहीम

मद्यपी चालकांविरुद्ध गुरुवारपासूनच तीव्र मोहीम राबवण्यात येत आहे.  न्यू इअर सेलिब्रेशनसाठी मुंबईत रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी पार्ट्या आयोजित केल्या जातात. त्यावेळी रात्री दारु पिऊन नशेतच वाहने चालविण्याच्या घटना घडतात. त्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम राबवण्यात येणार आहे. चालकांच्या तपासणीसाठी वापरण्यात येणा-या ब्रेथ ऍनालायझरवर बंदी होती. मात्र, आता कोरोनाचा फारसा प्रभाव नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडण्याची शक्यताय. त्यामुळे पोलीस ऍक्शन मोडवर आलेत. 

मदतीसाठी पोलिसांनी हेल्पलाईन नंबर जारी

कल्याणमध्ये पोलिसांनी विशेष मोहिम आखली आहे.  31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट झाले आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी हेल्पलाईन नंबरचे  पत्रकं विविध ठिकाणी लावली आहेत. अनुचित प्रकार घडत असल्यास ,संशयित आढळल्यास 112 नंबर डायल करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अवघ्या 5 ते 7 मिनिटात पोलीस घटनास्थळी दाखल होतील असे पोलिसांनी सांगितले. 
नवी मुंबई पोलीसांनी नवं वर्षाचं स्वागत करताना नियम पाळण्याचं आवाहन केले आहे. नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, पब आणि फार्म हाऊस असल्याने पोलिसांची  विशेष नजर असणार आहे.

पुणे पोलीस 31 डिसेंबरसाठी सज्ज

पुणे पोलीस 31 डिसेंबरसाठी सज्ज झाले आहेत.  थर्टी फर्स्ट साजरी करणा-यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. पुण्यात 4000 पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी तैनात असणार आहेत.  ड्रिंक अँड ड्राईव्ह करणा-यांवर पोलिसांची नजर असणार आहे.  31 डिसेंबर रोजी पुण्यातील दोन  प्रमुख रस्ते होणार नो वेहिकल झोन असणार आहेत.  पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता आणि महात्मा गांधी रस्ता वाहनांसाठी बंद राहणार आहे.  रस्त्यात धांगडधिंगा, विनाकारण आरडाओरडी करणे देखील महागात पडू शकते. कारण, अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर पोलिस थेट कारवाईचा बडगा उगारणार आहेत.