मुंबई पालिकेत पदवीधरांना नोकरीची संधी, 92 हजारपर्यंत मिळेल पगार
BMC Bharti 2024: अनुज्ञापन निरीक्षक पदांची एकूण 118 रिक्त भरण्यात येणार आहेत.
BMC Bharti 2024: तुम्ही पदवीधर आहात आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. मुंबई पालिकेतील कोणत्या ना कोणत्या खात्यात नोकरी मिळावी ही प्रत्येक मुंबईकराची इच्छा असते. पण अनेकदा भरतीबद्दल उशीरा कळल्याने संधी निघून गेलेली असते. त्यामुळे आता आपण आगामी भरतीबद्दल जाणून घेऊया. मुंबई पालिकेच्या परवाना निरीक्षक अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. अनुज्ञापन निरीक्षक पदांची एकूण 118 रिक्त भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा तपशील देण्यात आला आहे.
रिक्त पदांचा तपशील
अनुज्ञापन निरीक्षक पदाच्या एकूण 118 जागा भरल्या जातील. यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. खुल्या गटातील उमेदवारांसाठी 38 तर मागासवर्गीय गटातील उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवाराला संबंधित कामाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असावा. उमेदवाराला मराठीचे ज्ञान असावे. लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
145 कोटींची नोकरी सोडत उभारली 8300 कोटींची कंपनी, महिलेची प्रेरणादायी कहाणी
पगार
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना एम 17 नुसार 29 हजार 200 ते 92 हजार 300 इतका पगार दिला जाणार आहे.
बारावी ते पीएचडीपर्यंत मुलींना मिळते शिष्यवृत्ती! पात्रता, अर्ज प्रक्रिया सर्वकाही जाणून घ्या
अर्ज शुल्क
खुला प्रवर्गातील उमेदवारांना 1 हजार रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांकडून 900 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे.
अर्जाची शेवटची तारीख
20 एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून 17 मे ही अर्जाची शेवटची तारीख आहे.