Cosmos Bank Recruitment 2023: बॅंकेत नोकरी करावी असे प्रत्येक पदवीधराचे स्वप्न असते. बॅंकेमध्ये सरकारी नियमाप्रमाणे सुट्ट्या तसेच वेळोवेळी पगारवाढ आणि इतर फायदे मिळतात. त्यामुळे बॅंकेत नोकरी करतो असं म्हटलं की अनेकांना चांगल वाटतं. पण बॅंकेत नोकर भरती कधी सुरु होते हे अनेकांना माहिती नसते. तुम्हीही त्यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदवीधर उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहे.  


कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत एकूण 220 पदे भरली जाणार आहेत. व्यवस्थापक, सहाय्यक मॅनेजर, ऑफिसर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आणि टीम लीडर- मार्केटिंग या पदांचा समावेश आहे.


व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून JAIIB/ CAIIB आणि / किंवा CA/ CS/ ICWA मधील कोणत्याही फॅकल्टीमधून प्रथम श्रेणी वाणिज्य पदवीधर किंवा एमबीए उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय  40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.


सहाय्यक मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून JAIIB/ CAIIB आणि / किंवा CA/ CS/ ICWA मधील कोणत्याही फॅकल्टीमधून प्रथम श्रेणी वाणिज्य पदवीधर किंवा एमबीए पूर्ण करणे आवश्यक आहे.  या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय  35 वर्षांपेक्षा जास्त नसावे.


ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतूनJAIIB/ CAIIB आणि / किंवा CA/ CS/ ICWA मधील कोणत्याही फॅकल्टीमधून प्रथम श्रेणी वाणिज्य पदवीधर किंवा एमबीए उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे.


मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून मार्केटिंगमधील स्पेशलायझेशनसह पदवी/ पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे.


विद्यापीठ अनुदान आयोगात विविध पदांची भरती, पुण्यात नोकरीसह 2 लाखांपर्यंत मिळेल पगार


टीम लीडर- मार्केटिंग पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून मार्केटिंगमधील स्पेशलायझेशनसह पदवी/ पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.  या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.


या विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच बॅंकेच्या नियमानुसार त्यांना पगार देण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी करावी लागेल. 


भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती, मुंबईत नोकरी आणि 80 हजारपर्यंत पगार


इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 11 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.


पदभरतीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा