भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती, मुंबईत नोकरी आणि 80 हजारपर्यंत पगार

Sports Authority of India Job: भारतीय क्रीडा प्राधिकरणात ज्युनिअर अ‍ॅडव्हायजर आणि यंग प्रोफेशनल ही पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या मुदतीच्या आत संस्थेकडे अर्ज पाठवू शकतात.

Pravin Dabholkar | Updated: Aug 1, 2023, 04:28 PM IST
भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती, मुंबईत नोकरी आणि 80 हजारपर्यंत पगार title=

Sports Authority of India Job: तुम्हाला खेळाची आवड आहे का? स्पोर्ट्समध्ये तुम्ही काही विशेष प्राविण्य मिळवले आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये पदवी उत्तीर्णांना अर्ज करता येणार आहे. स्पोर्ट्स अथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आहे आहे. 

भारतीय क्रीडा प्राधिकरणात ज्युनिअर अ‍ॅडव्हायजर आणि यंग प्रोफेशनल ही पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या मुदतीच्या आत संस्थेकडे अर्ज पाठवू शकतात.

कनिष्ठ सल्लागारचे एक पद भरले जाणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून वित्त/लेखा/ वाणिज्य या विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. किंवा वित्तीय व्यवस्थापन/लेखा/सीए/आयसीएमएमध्ये दोन वर्षांचा पीजी डिप्लोमा पूर्ण करणे गरजेचे आहे.

दुसरीकडे यंग प्रोफेशनलचे 1 पद भरले जाणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून  स्पोर्ट्स मॅनेजमेंटमधील डिप्लोमा कोर्स पूर्ण केलेला असावा.

यासोबतच अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही विषयातील पदव (प्रमाणपत्र/डिप्लोमा कालावधी 6 महिन्यांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे). 02)  असणे आवश्यक आहे. उमेदवाराने  बीए/पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (2 वर्षे) पूर्ण केलेला असावा. 

निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी दिली जाणार आहे. 

वयोमर्यादा

ज्युनिअर अ‍ॅडव्हायजर आणि यंग प्रोफेशनल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 32 ते 45 वर्षापर्यंत असावे. एससी/एसटी उमेदवारांना 5 वर्षांपर्यंत, ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे.

पगार

या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 50 हजार रुपये ते 80 हजार 250 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

अर्जाची शेवटची तारीख

9 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यासाठी स्पोर्ट अथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. 

IBPS अंतर्गत विविध बॅंकांमध्ये बंपर भरती

IBPS PO Bharti 2023: बॅंकेत चांगल्या पगाराची नोकरी शोधणाऱ्या पदवीधरांसाठी महत्वाची अपडेट समोर येत आहे.  आयबीपीएसमार्फत नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. 
यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

आयबीपीएस पीओ अंतर्गत एकूण 3 हजार 49 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) ही पदे भरली जाणार आहेत. 

बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, यूको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या बॅंका आयबीपीएस भरतीमध्ये सहभागी झाल्या आहेत.