Mumbai Fire: घाटकोपर (Ghatkopar) येथील असल्फा परिसरातील मस्जिद गल्ली परिसरातील कचरा गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीचं करण अस्पष्ट असल्याचं समोर येत आहे. गोदामात प्लास्टीकचा कचरा मोठ्या प्रमाणात भरलेला असल्यानं आग भडकली ज्यामुळे परिसरात सर्वत्र धुराचं साम्राज्य असल्यामुळे परिसरातील नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


चिंचोळ्या गल्लीत आग  लागल्यामुळे अग्निशमन दल आणि पोलीस दलाकडून (Fire Brigade and Police Force) बचावकार्य (Rescue operation) युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या 4 गाड्या आणि 4 टँकर तैनात करण्यात आले आहे.