कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईकरांसाठी(Mumbai) लवकरच ऑनलाईन पार्किंग बुकिंग सेवा(Online parking booking) सुरू होणार आहे. फाईंड माय पार्किंग(Find My Parking) प्रणालीचा वापर करून नागरिकांना मोबाईलवरच आपल्या वाहनाच्या पार्किंगसाठी जागा शोधता येणार आहे. यामुळे मुंबईकरांना पार्किंगसाठी कुठेही धावा धाव करावी लागणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत अनेक ठिकाणी ही ऑलनाईन पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. भांडूपचा एस वॉर्ड, अंधेरी पश्चिमेचा के वेस्ट, लोअर परळचा जी साऊथ आणि नाना चौकातला डी अशा चार वॉर्डामध्ये प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. 


रहिवासी इमारतीतील रिकामी जागाही पार्किंगसाठी काही काळाकरता वापरायला दिली जाणार आहे. मुंबई महापालिका मुंबई पार्किंग ॲाथरिटीचा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाईल . पालिकेच्या नव्या पार्किंग पॅालिसीचा नियमांत समावेश करण्यात येणार आहे. 


मुंबईतील सगळी पार्किंग व्यवस्था एकाच सॅाफ्टवेअरवर प्री बुकिंग पध्दतीने पार्किंग व्यवस्था मिळणार आहे. यासाठी पार्किंग चार्जेस निश्चित करण्यात येणार आहेत.  फाईंड माय पार्किंग या प्रणालीचा वापर करत नागरिकांना वाहन पार्किंग करता येणार असल्याचे मुंबई पार्किंग ॲाथरिटीच्या प्रमुख प्राची मर्चंट यांनी सांगितले.