मुंबई : डिलाईल पूलापाठोपाठ आता करीरोडचा रेल्वेपूलला लागून असणारा पादचारी पूल लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. करीरोडचा हा पूल १०३ वर्ष जुना आहे. गोखले पूलाची दुघर्टना झाल्यावर रेल्वे आणि महापालिकेनं मुंबईतल्या सर्वच पुलांचं ऑडिट सुरू केलं. त्यातच करीरोडचा पूलसोबत असणारा पादचारी मार्ग धोक धोकादायक असल्याचं पुढे आल्यानं तो लवकरच बंद करण्यात येणार आहे. रेल्वेचे अधिकारी त्याबाबत लवकरच निर्णय घेणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतला लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळचा पूल पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आला आहे. वाहनांसाठी मात्र बंदी कायम आहे. 


दरम्यान, लोअर परळसह मुंबईतील सहा रेल्वे पुलांबाबत पश्चिम रेल्वेने अक्षम्य निष्काळजीपणा केल्याचा गंभीर आरोप मुंबई महानगरपालिकेने केला होता. लोअर परळपाठोपाठ ग्रँट रोड, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, एलफिन्स्टन आणि दादरचा टिळक पूल लवकरच बंद केले जाणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. या सहा पुलांच्या दुरूस्तीसाठी ८० कोटी रूपये खर्च अपेक्षित होता. मुंबई महापालिका हा खर्च उचलायला तयार होती. मात्र, पश्चिम रेल्वे प्रशासनानं त्याबाबत काहीच प्रतिसाद दिला नाही. गेल्या दीड वर्षांपासून केवळ निविदा काढण्याचे आश्वासन रेल्वेकडून देण्यात आले. अंधेरीचा पूल कोसळल्यानंतर पश्चिम रेल्वेला खडबडून जाग आल्याचे पालिकेने सांगितले.