मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून (andheri bypoll election) भाजपाने (BJP) माघार घेतली आहे. भाजपाने मुरजी पटेल (Murji Patel) यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयानंतर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही या निर्णयानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘पत्रा चाळ’कथित घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर कोर्टात सध्या सुनावणी सुरु आहे. यावेळी संजय राऊत कोर्टात आले आहेत. यावेळी त्यांनी भाजपने घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया दिलीय. (Shivsena Sanjay Raut reaction after BJP withdrew from Andheri by election)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल आमच्याच बाजूने लागणार याची खात्री होती. थोड्या थोडक्या नाही 44 हजारांच्या मताने त्या जागेवर विजयी मिळणार होता," अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.


हे ही वाचा : हे ही वाचा : "भाजपने दुसऱ्यांदा काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला"


यावेळी संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिहीलेल्या पत्रावरही भाष्य केलं आहे. राज ठाकरे यांनी उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती पत्राद्वारे केली आहे. या पत्राबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'राज ठाकरेंचे पत्र म्हणजे ठरवून लिहिलेली स्क्रिप्ट आहे.'


निवडणूक माघार घेतल्यानंतर भाजपची प्रतिक्रिया


"भाजपने मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेण्याची घोषणा केली आहे. या निवडणुकीमध्ये ऋतुजा लटके (rutuja latke) निवडूण याव्यात म्हणून आम्ही अर्ज मागे घेत आहोत. मुरजी पटेल अपक्ष लढणार नाहीत. भाजपचा उमेदवार पक्षाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जात नाही," असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.