Andheri By Election : "भाजपने दुसऱ्यांदा काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला"

भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर माघार घेतली आहे.

संजय पाटील | Updated: Oct 17, 2022, 02:25 PM IST
Andheri By Election : "भाजपने दुसऱ्यांदा काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला" title=
(फोटो सौजन्य - PTI)

मुंबई : भाजपने (Bjp) वाढत्या दबावानंतर अखेर अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून (Andheri By Poll 2022) माघार घेतली आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर माघार घेतली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा विजयाचा मार्ग मोकळा झालाय. भाजपच्या माघारीनंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणकेर (Kishori Pednekar) यांनी प्रतिक्रिया दिली. (andheri by poll 2022 mumbai ex mayor kishori pednekar critisize to bjp after murji patel withdraw candidature)

पेडणकेर काय म्हणाल्या?

"भाजपने दुसऱ्यांदा काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला", अशा शब्दात पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. काही दिवसांपूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना काळजावर दगड ठेवत मुख्यमंत्री केल्याचं विधान केलं होतं. या विधानाला धरुन पेडणेकरांनी हा टोला लगावलाय.