मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. पहिल्या दोन ट्प्प्यांनतरही कोरोना नियंत्रणात येत असल्याची चिन्हं दिसली नसल्यामुळे पुढे मोठं संकट ओढावू नये यासाठी सावधगिरीचा बाळगत नव्याने लॉकडाऊनचा कावालधी वाढवण्यात आला. पण, या टप्प्यात काही नियम शिथिल करत दारुची दुकानं सुरु करण्यापासून इतरही दुकानं सुरु करण्याच्या बाबतीत काही नवे नियम आखण्यात आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत मात्र दारु विक्रीच्या या निर्णयानंतर दुराकानांच्या बाहेर लांबच लांब रांगा दिसल्या. जिथे मद्यपींनी दारु खरेदीसाठी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे दारु विक्रीसाठीसुद्धा आखून देण्यात आलेल्या नियमांचं पालन या ठिकाणी झाल्याचं दिसलं नाही. परिणामी कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक बळावला. याच कारणास्तव विशेषाधिकारांचा वापर करत पालिका आयुक्तांनी मुंबईतील लॉकडाऊन आणखी कठोर करणार असल्याचा इशारा देत शहरात दुकानं खुली करण्यासंदर्भात देण्यात आलेल्या सर्व सवलती रद्द केल्याचं जाहीर केलं. आयुक्यांच्या आदेशांनुसार झालेले बदल खालीलप्रमाणे.... 


वाचा : 'भारतीयांनी ऑफिसमध्ये जास्तवेळ काम केले तर अर्थव्यवस्था पटकन उभारी घेईल'


काय सुरु राहणार? 


किराणा आणि वैद्यकिय सामग्री मिळणारी दुकानं अर्थात मेडिकल सुरु राहतील. 


भाजीपाला, फळविक्री आणि किराणा मालाची दुकानं सुरु राहतील. 


बाजारपेठ संकुलामध्ये असणारी जीवनावश्यक सेवांची दुकानं सुरु राहतील.


कंटेन्मेंट झोन वगळता महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीत शेजारील दुकानं, निवासी संकुलांमधील जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं सुरु राहतील. 



काय बंद राहणार? 


महानगरपालिकेच्या हद्दीत, अर्थात शहरी भागात असणारे मॉल, बाजारपेठ संकुल आणि बाजारपेठा बंद राहतील. 


कोणत्याही प्रकारची दारुची दुकानं बंद राहतील. 


एमएमआर क्षेत्रात रांगेत पाच अत्यावश्य सेवांव्यतिरिक्तची दुकानं सुरु ठेवण्याचा निर्णयही मागे घेण्यात आला आहे. 


 


वाचा : 'कोरोनाच्या उत्पत्तीबाबत ठोस पुरावे' अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा धक्कादायक खुलासा