'कोरोनाच्या उत्पत्तीबाबत ठोस पुरावे' अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा धक्कादायक खुलासा

कोरोना व्हायरस कुठे आणि कसा तयार झाला?

Updated: May 4, 2020, 05:37 PM IST
'कोरोनाच्या उत्पत्तीबाबत ठोस पुरावे' अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा धक्कादायक खुलासा

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. पण कोरोना व्हायरस कुठे आणि कसा तयार झाला? याबाबत अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी मात्र याबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. कोरोना व्हायरस चीनमधल्या वुहान प्रयोगशाळेतूनच बाहेर पडला आहे, याचे आमच्याकडे ठोस पुरावे आहेत, असं पोम्पिओ म्हणाले. चीनने जाणूनबुजून हा व्हायरस पसरवला का? याचं उत्तर मात्र पोम्पिओ यांनी दिलं नाही.

एबीसी न्यूजसोबत बोलताना पोम्पिओनी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या रिपोर्टवरही सहमत असल्याचं सांगितलं. कोरोना व्हायरस मानवनिर्मित नाही, तसंच याला अनुवंशिक विकसित करण्यात आलेलं नाही, असं हा रिपोर्ट सांगतो. पण कोरोना व्हायरस वुहानच्या लॅबमधूनच निघाल्याचे पुरावे आहेत, या ट्रम्प यांच्या वक्तव्याशी आपण सहमत आहोत, असंही पोम्पिओ यांनी मान्य केलं.

कोरोना व्हायरसमुळे मागच्या २४ तासात अमेरिकेत २४ तासात १,४५० जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारपर्यंत अमेरिकेत कोरोनाचे ११ लाख रुग्ण झाले होते, तर ६७ हजार जणांचा मृत्यू झाला होता.