मुंबई : व्यसन तुमच्या आयुष्यातील सर्व बाबींवर आपसूकच परिणाम करत असते. साहजिकच याचा परिणाम वाईट असतो. आर्थिक स्थिती, आरोग्य, नाती अशा सर्वच गोष्टींमध्ये व्यसन ही समस्या बनते. दारू, सिगारेटच्या अतिसेवनामुळे अनेक आजार उद्भवतात. यकृताचे रोग, कर्करोग अशा गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.


दारूच्या अतिसेवनामुळे कोणते दुष्परिणाम होतात ?
1. अति मद्यपानामुळे हेपेटायटिस, यकृत आणि अन्य इंद्रियांमधील ऱ्हासकारक बदल असे आजार होऊ शकतात.
2. दारूमुळे पोटाचा अल्सर, जठराला सूज येणे तसेच अनेक पाचक समस्या निर्माण होतात.
3. मद्यपान केल्याने उच्च रक्तदाब आणि ह्रदयरोग होतो.
4. महिला मद्यपींना पाळीविषयक समस्या जाणवू शकतात.
5. दारू पिण्याच्या वाईट सवयीमुळे तोंड, यकृत, घसा आणि स्तनाचा कर्करोग होऊ शकतो.
6. गर्भधारणेच्या दरम्यान मद्यपान केल्याने गर्भपात होण्याची शक्यता असते. तसेच फेटल अल्कोहोल सिंड्रोम (FAS) होऊ शकतो. FAS  म्हणजे आईच्या गर्भधारणेतील मद्यपानामुळे मुलांमध्ये दोष निर्माण होऊ शकतो.