नवी दिल्ली : सरकारने १०० आणि ५० रूपयाच्या नोटवर बंदी आणण्याचा कोणताही विचार नसल्याचं म्हटलं आहे. ट्वीटरवरील अशा गोष्टी म्हणजे अफवा असल्याचं सरकारने म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीआयबीने ट्विटरवर म्हटलं आहे की, हे सर्व आधारहीन आहे, ५०, १०० च्या नोटेवर बंदी लावण्याचा विचार दूरदूरपर्यंत नाही. अशी खोटी माहिती ट्विटरवरही पसरवंल जाणार आहे.


तसेच बँक लॉकरला सील करण्याचा तसेच सोने बाहेर काढण्याचा कोणताही उद्देश नाही. दोन हजार रूपयाच्या नोटेचा रंग जाणे ही या नोटेची सुरक्षिततेचं वैशिष्ट्ये आहे.


तसेच २ हजार रूपयाच्या नोटेला चीप लावली आहे, ही गोष्ट देखील मनाते श्लोक असल्याचंही सांगण्यात आलंय. नोटेत अशी कोणतीही चिप नसल्याचं पीआयबीने माहिती देताना म्हटलंय.