लखनऊ : नव्या - जुन्या नोटांवर लिहिलेलं 'सोनम गुप्ता बेवफा है' हे वाक्य खूपच व्हायरल होत असतानाच... खरोखरच कुणा मुलीचं नाव सोनम गुप्ता असू शकतं हे कुणाच्या ध्यानीमनीही आलं नाही. याचीच परिणीती म्हणजे, सोनम गुप्ता नाव असलेल्या एका तरुणीचं ठरलेलं लग्न मोडलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सोनम गुप्ता बेवफा है' असं लिहिलेली नोट सोशल मीडिया, टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्येही झळकली... त्यानंतर उत्तरप्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील मंझनपूरमध्ये राहणाऱ्या सोनम गुप्ता नावाच्या तरुणीचं लग्न मोडलं. 


सोनम गुप्ताच्या 'बेवफाई'च्या चर्चेवर वरपक्षानं विश्वास ठेवला आणि हे लग्न मोडलं. 15 नोव्हेंबर रोजी या जोडप्याचा तिलक समारंभ झाला होता. 


लग्नाच्या आमंत्रण पत्रिकाही वाटल्या गेल्या... आणि या नोटा समोर आल्यानंतर विवाहाच्या आनंदाचं चित्र एकदम विवाह मोडल्याच्या दुखा:नं काळवंडून गेलं. लग्नाला तीन दिवस उरले असताना वरपक्षानं हे लग्न मोडलं...