मुंबई : बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी ऐश्वर्या रॉयला माफी मागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन वर्षांपूर्वी 'कॉफी विथ करण'शो मध्ये  ऐश्वर्याचा विषय सुरू असताना  इमरान ने ऐश्वर्याला 'प्लास्टिक' म्हटलं होतं.


मिलन लुथरियाच्या येणाऱ्या 'बादशाहो' चित्रपटात अभिनेता अजय देवगण आणि इमरान हाशमी मुख्य भूमिकेत आहेत. 


ऐश्वर्याने कथा वाचल्यानंतर हा सिनेमा करण्यासाठी नकार दिला आहे. कारण यात  ऐश्वर्याचे जास्त सीन इमरानच्या विरोधात होते. 


'मला नाही माहित या सिनेमाच्या मुख्य भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीला विचारण्यात आलं आहे. मी ऐश्वर्याचा मोठा प्रशंसक असून, दोन वर्षांपूर्वी मस्करीत केलेल्या टिप्पणीसाठी मी तिची माफी मागणार आहे'. यात काही व्यक्तीगत घेण्यासारखं नव्हतं. असं इमरान हाशमीने सांगितल आहे.