बदलापूर : दिवाळीला मिळणारा बोनस हा प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. मात्र आता सरकारी आणि खासगी कर्मचा-यांबरोबर रिक्षा चालकानाही बोनस मिळालाय. बदलापूरमधील रिक्षा चालकांना संघटनेकडून बोनस मिळालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिक्षावाल्यांनी आपल्या  रोजच्या मिळकतीतून काही पैसे बाजूला ठेवून ती रक्कम दिवाळीत बोनस म्हणून वापरण्याची योजना सुरु केली आणि आता ती रिक्षाचालकांमध्ये भलतीच लोकप्रिय ठरली आहे. 


यंदा या योजनेमार्फत बदलापुरातील २६० रिक्षाचालकांना तब्बल २२ लाख ४० हजार रूपये संघटनेच्या वतीने बोनस रुपात  देण्यात आला.