बीड : सर्पदंश झालेला पेशंटला तपासण्यासाठी जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर लवकर येत नव्हते, याची माहिती बीडचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना माहित झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हाधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब केला नाही आणि अवघ्या १० मिनिटात, रात्री ११ वाजेच्या सुमारास ते जिल्हा रूग्णालयात पोहोचले.


रूग्ण हा जिल्हाधिकाऱ्यांच्या ओळखीचा नव्हता. जिल्हाधिकारी स्वत: एका अनोळखी रूग्णासाठी अचानकच दवाखान्यात दाखल झाले, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.


जिल्हाधिकारी राम यांनी स्वत: लक्ष घातल्याने राम थोरात या सर्पदंश झालेल्या रूग्णावर, लगेच उपचार सुरू करण्यात आले आहेत.


अनेक डॉक्टर जागेवर नसल्याचं आढळून आले, जिल्हाधिकारी राम यांनी मस्टर तपासून सकाळी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. डॉक्टरांची मात्र दातखिळीच बसली.