लातूर : शहराजवळील साखरापाटी इथल्या हिरेमठ पेट्रोलपंप लुटण्यासाठी गोळीबार आणि पेट्रोलपंप मालकावर प्राणघातक हल्ला झाला होता. यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेतील सर्वच्या सर्व आरोपीना पकडण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे. २४ तासाच्या आत लातूर पोलिसांनी या घटनेतील तीन आरोपींना अटक केली आहे. 


प्रभुलिंग लखादिवे, सचिन कावळे आणि प्रदीप ओगले अशी आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडून २ तोळे सोनं, रोख ४० हजार रुपये, एक देशी पिस्टल आणि ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.