लातूर : लातूर जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस पडला. ज्यात तूर खरेदी केंद्रावरील तुरीचे मोठं नुकसान झालंय. त्यामुळे या भिजलेल्या तुरीचे काय करावं असा सवाल शेतकऱ्यांनी विचारलाय. यावेळी रेणापूर येथील तूर खरेदी केंद्रावर भिजलेल्या तुरीबाबत शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली आहे.


मागील १५ दिवसांपासून तूरचा सांभाळ शेतकरी बाजार समिती आवारात करत आहेत, त्यांची तूर घेतली गेली नाही, सर्व कामसोडून तूर सांभाळण्याचच काम त्यांना करावं लागतंय, यात आता तूर भिजल्याने सरकार ही तूर घेणार का हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.