मुंबई : पक्षात फेरबदलाच्या दृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज 'मातोश्री'वर  महत्वाची बैठक बोलावली आहे. सायंकाळी सहा वाजता होणा-या या बैठकीला पक्षाचे मंत्री आणि आमदारांना पाचारण करण्यात येणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीत शिवसेनेच्या काही ज्येष्ठ मंत्र्यानां डच्चू दिले जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आगामी लोकसभा आणि विधान सभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी मंत्री फेरबदलाचा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येतेय. 


पक्षातील 5 कॅबिनेट मंत्र्यापैकी सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि डॉ. दीपक सावंत हे चार मंत्री विधान परिषदेतील आहेत. गेल्या अडीच वर्षातील कॅबिनेट मंत्र्यांच्या कामगिरीवर उद्धव ठाकरे फारसे समाधानी नाहीत. 


तसेच सत्ता असूनही कामे होत नाहीत, मतदार संघात पुरेसा विकास कामांसाठी मुख्यमंत्र्याकडून निधी मिळवून देण्यास कॅबिनेट मंत्री कमी पडतात याबद्दल पक्षाच्या आमदारांमध्ये तीव्र रोष आहे. याचा पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय.