वेस्ट इंडिज दौऱ्याआधीच टीम इंडियाला मोठा झटका
वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याआधीच टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. ऑफ स्पिनर आर. अश्विनला दुखापत झाली आहे.
मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याआधीच टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. ऑफ स्पिनर आर. अश्विनला दुखापत झाली आहे.
बंगळुरुमध्ये प्रॅक्टिस कॅम्प दरम्यान अश्विनच्या हाताला बॉल लागल्याने तो मैदानातून बाहेर निघून गेला. अश्विनच्या ज्या हाताने बॉल टाकतो त्याच हाताला बॉल लागल्याने भारतासाठी ही बॅडन्यूज आहे. अश्विनला बॉलिंग करतांनाही त्रास होत असल्याने चिंता वाढल्या आहे.
2015-2016 मध्ये अश्विनने सर्वात अधिक विकेट घेतले होते त्यानंतर तो पहिल्या स्थानावर होता. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडिया 6 जुलैला सेंट किट्स येथे पोहोचणार आहे. टीमचा हा दौरा 49 दिवसांचा असणार आहे.
भारतीय संघ पहिला प्रॅक्टिस मॅच 9 जुलैला सेंट किट्समधील वार्नर पार्कवर खेळणार आहे जो २ दिवसाची असेल. यानंतर 14 जुलैला ते 16 जुलै दरम्यान वार्नर पार्कवरच तीन दिवसीय मॅच खेळली जाणार आहे.