ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय खेळाडूंबद्दल शोभा डे बरळल्या
पेज थ्री पत्रकार शोभा डे या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल नेहमीच चर्चेत असतात.
मुंबई : पेज थ्री पत्रकार शोभा डे या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल नेहमीच चर्चेत असतात. यंदा त्यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताकडून खेळणाऱ्या खेळाडूंविषयी वादग्रस्त ट्विट केलं आहे.
ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचं केवळ एकच लक्ष्य आहे. रियोला जा, सेल्फी काढा आणि खाली हात परत या. हा संधी आणि पैशांचा अपव्यय आहे, असं ट्विट शोभा डेंनी केलं आहे. शोभा डेंच्या या ट्विटमुळे नवा वाद निर्माण व्हायची शक्यता आहे.