मुंबई : राज्य सरकारच्या धोरण लकव्यामुळे राज्यातल्या मराठी विद्यार्थ्यांना मेडीकलच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अॅडमिशन मिळणं कठीण होणार आहे. यंदा पोस्ट ग्रँज्यूएशनचे सर्व प्रवेश हे नीट अंतर्गत होत असल्यामुळं इतर राज्यांनी यातून पळवाट काढत अभिमत विद्यापीठांमध्ये राज्यातील मुलांसाठी कोटा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू महाराष्ट्र सरकारने असा कोणताही निर्णय न घेतल्यामुळं भूमिपुत्रांवर अन्याय होतोय. त्याविरोधात आता वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सेना, मनसेला या प्रकरणी लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे.


सरकारने निर्णय न घेतल्यास राज्यातील १० अभिमत विद्यापीठांमध्ये परराज्यातील मुलांना अधिक जागा उपलब्ध होतील, तर मराठी मुले मात्र प्रवेशापासून वंचित राहतील. कुठलाच राजकीय पक्ष मराठी मुलांच्या मदतीसाठी पुढं येत नसल्यानं हे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.