Lunar Eclipse 2023 Horoscope : यंदाची शरद पौर्णिमा अतिशय खास आहे. या वर्षाचं शेवटं चंद्रग्रहण 28-29 ऑक्टोबरला असणार आहे. हे चंद्रग्रहण मध्यरात्री 01:06 वाजेपासून 02:22 वाजेपर्यंत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे चंद्रग्रहण अश्विनी नक्षत्र आणि मेष राशीत होणार आहे. 2023 मध्ये हे एकमेव चंद्रग्रहण आहे, जे भारतात दिसणार आहे. त्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध असणार आहे. त्याचा सुतक 28 ऑक्टोबरला दुपारी 02:52 वाजेपासून सुरु होणार आहे. या चंद्रग्रहणाचा सर्व राशींवर परिणाम होणार असून 6 राशींवर त्याचा सर्वाधिक नकारात्मक प्रभाव पडणार आहे. (lunar eclipse Negative impact 6 zodiac signs should be careful on job health and love life chandra grahan)


मेष (Aries Zodiac)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण मेष राशीच्या लोकांसाठी अशुभ असणार आहे. तुमच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनावर याचा नकारात्मक परिणाम होणार आहे. तणावामुळे तुमचं वर्तन बिघडणार आहे. त्यामुळे तुमच्या नातेसंबंधांवर वाईट परिणाम होईल. चंद्रग्रहणाच्या दिवशी तुम्ही कोणतीही गुंतवणूक करु नका. शिवाय नवीन कामही हातात घेऊ नका. हे तुमच्यासाठी हानिकारक होईल. त्याच्यासोबत आरोग्याची काळजी घ्या. 


वृषभ (Taurus Zodiac) 


चंद्रग्रहणाच्या दिवशी तुमच्या जीवनात तणाव घेऊन येणार आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा कारक मानलं जातं. चंद्रामुळे तुमचं मन अस्वस्थ होणार आहे. त्या दिवशी तुमचा खर्चही भरमसाठ वाढणार आहे. फालतू खर्च टाळा अन्यथा तुमच्यावर आर्थिक संकट कोसळेल. 


कर्क (Cancer Zodiac) 


तुमच्या राशीचा अधिपती ग्रह चंद्र असल्याने ग्रहणाचा वाईट परिणाम होईल. अशा स्थितीत वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाच्या दिवशीही तुम्ही विशेष काळजी घ्या. चंद्रग्रहण तुमच्यासाठी अशुभ परिणाम घेऊन येणार आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी सावधपणे काम करावं लागणार आहे. निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो. या दिवशी आरोग्याची काळजी घ्या. 


कन्या (Virgo Zodiac)


चंद्रग्रहण तुमच्या राशीच्या लोकांसाठी संमिश्र परिणाम घेऊन येणार आहे. एकीकडे तुम्हाला पैसा मिळू शकतो पण खर्चावर नियंत्रण नसल्यामुळे तुम्हाला पैशाची चणचण जाणवणार आहे. जर तुम्ही तुमच्या उधळपट्टीवर नियंत्रण ठेवले नाही तर तुम्हाला इतरांकडून पैसे उसणे घ्यावे लागतील. 


हेसुद्धा वाचा - Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहणाला शश राजयोगासह 4 दुर्मिळ योग! 'या' राशींच्या लोकांचं ग्रहण सुटणार, बँक बॅलेन्स वाढणार


वृश्चिक (Scorpio Zodiac)


वर्षाच्या दुसऱ्या चंद्रग्रहणाच्या दिवशी तुमच्या राशीच्या लोकांनी शत्रूंपासून सावध राहावे लागणार आहे. ते तुमच्यासाठी काही समस्या निर्माण करण्याची भीती आहे. तुम्ही तुमचं काम गोपनीय ठेवावं लागणार आहे. तुमची माहिती लीक होणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा तिचा गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे. 


मीन (Pisces Zodiac)


चंद्रग्रहण तुमच्या राशीच्या आठव्या घरात होणार आहे. यामुळे तुमच्या प्रेम जीवनात तणाव निर्माण होण्याची भीती आहे.  जोडीदाराशी संयम बाळगा आणि तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ देऊ नका. राग आणि वाणीवर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी योग्य होईल. गोष्टी शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करणे बरं होईल. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)