मुंबई : आज अनेक जण मनी प्लांट आर्थिक रूपात फायदा होण्यासाठी लावतात. अनेक जणांच्या घरात किंवा घरा बाहेर हा मनी प्लांट दिसतो. मनी प्लांट लावल्याने आर्थिक फायदा होतो अशी मान्यता आहे. पण वास्तु शास्त्रानुसार जर तुम्ही हा मनी प्लांट लावला नसेल तर यामुळे आर्थिक नुकसान देखील होऊ शकतं. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घरात एका विशिष्ट दिशेला लावलं गेलं पाहिजे. तरच त्याचा फायदा होतो. चुकीची दिशा आर्थिक नुकसानीला कारणीभूत ठरु शकते.


कोणती आहे योग्य दिशा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट आग्नेय दिशेला लावलं गेलं पाहिजे. आग्नेय दिशेला झाड लावल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते. याचा लाभ होतो.


आग्नेय दिशेला का लावावे


मनी प्लांट आग्नेय दिशेला लावण्यामागचं एक कारण आहे. आग्नेय म्हणजे दक्षिण-पूर्वच्या मधली दिशा. या दिशेचे देवता गणपती आहेत. गणपती अशुभ गोष्टीचा नाश करतात. त्यामुळे मनी प्लांट आग्नेय दिशेला लावलं पाहिजे. या दिशेचं प्रतिनिधीत्व शुक्र करतो. शुक्र हा सुख समृद्धी आणतो. यामुळे मनी प्लांट आग्नेय दिशेला लावलं पाहिजे.


कोणत्या दिशेला लावू नये 


वास्तुशास्त्रानुसार मनीप्लांट ईशान्य दिशेला लावू नये. ईशान्य म्हणजे उत्तर-पूर्व मधली दिशा. ही दिशा मनी प्लांटसाठी नकारात्मक ऊर्जा देणारी दिशा आहे. या दिशेचे प्रतिनिधीत्व बृहस्पती करतात. शुक्र आणि बृहस्पतीमध्ये शत्रुत्वाचा संबंध आहे. ईशान्य दिशेला तुळस लावू शकता.