Shani Guru Vakri : वक्री शनि - गुरु `या` राशींवर करणार कृपा, 31 डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार वरदान
Shani Guru Vakri 2023 : शनि आणि गुरु वक्री स्थितीत आहे यामुळे वर्षभरानंतर दोन वर्षांवर याची कृपा बरसणार आहे. या लोकांना सुख आणि सौभाग्य लाभणार आहे.
Shani Guru Vakri 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि आणि देवगुरु अतिशय महत्त्वाचे ग्रह मानले जातात. हे दोन्ही ग्रह जेव्हा जेव्हा आपली स्थिती बदलतात तेव्हा त्याचा परिणाम 12 राशींवर दिसून येतो. काहींसाठी तो सकारात्मक असतो तर काहींसाठी नकारात्मक परिणाम घेऊन येतो. सध्या शनि कुंभ राशीत तर देवगुरु बृहस्पति मेष राशीत विराजमान आहे. विशेष म्हणजे शनि आणि गुरु प्रतिगामी अवस्थेत आहे म्हणजे वक्री अवस्थेत विरुद्ध दिशेने फिरत आहेत.
गुरु आणि शनीची प्रतिगामी अवस्था दोन राशींच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. शनि 4 नोव्हेंबरला कुंभ राशीत मार्गी होणार आहे. तर गुरु 31 डिसेंबरला मार्गी होणार आहे. त्यापूर्वी 4 सप्टेंबरला गुरु मेष राशीत वक्री झाला आहे. (Saturn Jupiter retrograde will grace these 2 zodiac signs after a year the period till December 31 will be golden period)
'या' राशींसाठी पुढील दोन महिने असणार सुवर्ण काळ!
मकर (Capricorn Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी शनि आणि गुरूची प्रतिगामी हालचाल खूप शुभदायक ठरणार आहे. या दोन ग्रहांची उलटी हालचाल या राशींच्या लोकांसाठी धनलाभ घेऊन आला आहे. कार्यक्षेत्रात तुमच्यावर जबाबदारी वाढणार आहे. तुमचं कार्यक्षेत्रात कामाचा प्रभाव पडणार आहे. बदलत्या ग्रह स्थितीमुळे मालमत्ता किंवा वाहन गुंतवणुकीच्या संधी मिळणार आहे. त्यामुळे या वेळात जास्त जास्त फायदा घ्या.
हेसुद्धा वाचा - Mangal Gochar 2023 : हे लोक 16 नोव्हेंबरपर्यंत जगणार राजासारखं आयुष्य; दिवाळीत मंगळदेवामुळे छप्पडफाड पैसा
मिथुन (Gemini Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी शनि आणि गुरु वक्री स्थिती शुभलाभ घेऊन आला आहे. तुमचं नशीब पालटणार आहे. नशीब आणि यश तुमची साथ देणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रयत्नांमध्ये सकारात्मक परिणाम दिसणार आहे. तुमचं उत्पन्न वाढणार आहे. आध्यात्मिक गोष्टीत तुमचा रस वाढणार आहे. तुमच्यासाठी हा काळ वरदान ठरणार आहे.
हेसुद्धा - Budh Gochar 2023 : ग्रहांचा राजकुमार बुधदेव वृश्चिक राशीत करणार गोचर! 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)