Budh Gochar In November 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह हे 12 राशीत भ्रमण करत असतात. प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ग्रहांच्या या संक्रमणामुळे 2 राशीवर त्यांचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो. या ग्रहांच्या भ्रमणामुळे कुंडलीत एखाद्या राशीत शुभ किंवा अशुभ योगही तयार होता. 30 ऑक्टोबरला मायावी केतू आणि राहू दीड वर्षांनी आपली स्थिती बदलणार आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये बॅक टू बॅक शुक्र आणि शनि आपली स्थिती बदलणार आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ग्रहाचा राजकुमार बुधदेवही आपली स्थिती बदलणार आहे. नोव्हेंबरमध्ये बुध ग्रह तूळ राशीतून वृश्चिक राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे काही लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. चला मग जाणून घेऊयात या तुमच्या राशीचा समावेश आहे का? (Mercury will transit in Scorpio These zodiac signs will get success in every field and Budh gochar in november 2023)
राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण लकी ठरणार आहे. तुमच्या राशीच्या धन गृहात बुध ग्रह भ्रमण करेल. त्यामुळे तूळ राशीच्या लोकांना अनपेक्षित धनलाभ होणार आहे. बुध गोचरमुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तुमच्या राशीच्या नवव्या आणि बाराव्या घराचा स्वामी बुध ग्रह आहे. त्यामुळे या काळात नशीब तुम्हाला पूर्ण साथ मिळणार आहे. यावेळी तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होणार आहात.
बुध राशीतील बदल मकर राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरणार आहे. हे संक्रमण तुमच्या कुंडलीच्या उत्पन्नाच्या घरात असल्याने तुमचं उत्पन्न प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होणार आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना मोठ्या प्रमाणात प्रलंबित पैसे मिळणार असल्याने यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. त्याशिवाय तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात मोठी संधी चालू येणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण फायदेशीर आणि भाग्यशाली ठरणार आहे. बुध ग्रह तुमच्या राशीतून भाग्यस्थानात असणार आहे. त्यामुळे तुम्हाला या काळत नशीबाची पूर्णपणे साथ मिळणार आहे. यासोबतच मीन राशीचे लोक धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यामुळे घरातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला लाभणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.