Mangal Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह सध्या तूळ राशीत विराजमान आहे. तो येत्या नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. 16 नोव्हेंबर 2023 ला मंगळदेव तूळ राशीतून बाहेर पडून वृश्चिक राशीत विराजमान असणार आहे. पण त्यापूर्वीही मंगळ ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. मंगळदेव संपत्तीचा कारक शुक्र आणि न्यायदेवता शनिदेवाच्या आधी आपली स्थिती बदलणार आहे. मंगळदेव 1 नोव्हेंबरला विशाखा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी दिवाळी अतिशय खास असणार आहे. कारण संपत्ती कारक शुक्र, मंगळ आणि शनि या ग्रहांच्या स्थिती बदलामुळे काही राशीचं भाग्य उजळून निघणार आहे. मंगळ हा धैर्याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे 16 नोव्हेंबरपर्यंत काही राशींचे लोक राजासारखं जीवन जगणार आहे. (These people will live like kings until November 16 A lot of money due to Mars in Diwali 2023)
तूळ राशीतील मंगळाचे भ्रमण हे कर्क राशीच्या लोकांसाठी खूप जास्त भाग्यशाली सिद्ध होणार आहे. दिवाळीत तुम्ही जमीन, मालमत्ता आणि वाहने खरेदी करण्याचे दाट शक्यता कुंडलीत निर्माण झाली आहे. तर नोकरदार लोकांना बढती मिळणार आहे. मात्र या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
मंगळाचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम घेऊन आली आहे. तुम्ही या काळात जे काही कराल प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे. नोकरी-व्यवसायात प्रगती होणार आहे. अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहे. हा काळ तुमच्यासाठी सुवर्णकाळ ठरणार आहे.
तूळ राशीतील मंगळाचे संक्रमण हे वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे. जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. पैशाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या या काळात दूर होणार आहे. जमिनीशी संबंधित सर्व जुने प्रकरणही मार्गी लागणार आहे. एकंदरीत हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर करणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)