ऍडलेड : सोशल मीडियावर सध्या #10yearchallenge चा ट्रेण्ड सुरु आहे. यामध्ये सेलिब्रिटी आणि यूजर त्यांचे २००९ सालचे आणि २०१९ सालचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. या ट्रेण्डमध्ये आयसीसीनंही उडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी वनडे भारताला जिंकवून दिलेल्या धोनीचे दोन फोटो आयसीसीनं ट्विट केले आहेत. यातला एक फोटो हा २००९ सालचा तर दुसरा फोटो २०१९ सालचा ऍडलेड वनडेतला आहे. २००९ असो किंवा २०१९ धोनी अजूनही तशाच सिक्स मारतोय आणि मॅच संपवतोय! असं ट्विट आयसीसीनं केलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये धोनीनं ५४ बॉलमध्ये ५५ रन केले. ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी २९९ रनचं आव्हान दिलं होतं. विराट कोहलीनं त्याचं वनडे क्रिकेटमधलं ३९वं शतक झळकावलं. ११२ बॉलमध्ये १०४ रन करून विराट आऊट झाला. दिनेश कार्तिकनंही १४ बॉलमध्ये २५ रन करून भारताच्या विजयामध्ये मोलाचं योगदान दिलं. या मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीनं सिक्स मारून भारताला ४ बॉल राखून विजय मिळवून दिला.


मॅच विनिंग खेळीमध्ये धोनीची चूक, ऑस्ट्रेलिया-अंपायरचंही दुर्लक्ष


 


आयसीसीनं धोनीच नाही तर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचे सध्याचे आणि १० वर्ष जुने फोटो शेअर केले आहेत. यामध्ये न्यूझीलंडचा रॉस टेलर, श्रीलंकेचा लसीथ मलिंगा, पाकिस्तानचा मोहम्मद आमीर आणि ऑस्ट्रेलियाची एलीस पेरी यांचा समावेश आहे.






ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्या वनडेमध्ये भारतानं शानदार पुनरागमन केलं. यामुळे ३ वनडे मॅचची सीरिज आता १-१नं बरोबरीत आहे. शुक्रवारी १८ जानेवारीला मेलबर्नमध्ये तिसरी निर्णायक वनडे खेळवण्यात येणार आहे. या वनडेमध्ये ज्या टीमचा विजय होईल ती टीम सीरिजही खिशात टाकेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धची ३ टी-२० मॅचची सीरिज १-१नं बरोबरीत सुटली. तर टेस्ट सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला होता. 


VIDEO: मैदानातच धोनीचे खलील अहमदला अपशब्द?