Aaron Finch Announces Retirement : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या नुकत्याच होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी (Border Gavaskar Trophy) सध्या टीम ऑस्ट्रेलिया भारतच्या दौऱ्यावर आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार रांगडा खेळाडू एरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती  (Aaron Finch Retirement) घेतली आहे. अचानक घेतलेल्या निवृत्तीमुळे अनेकांना मोठा धक्का बसलाय. (Aaron Finch Australia T20 captain and former World Cup winner announces international retirement latest sports news)


काय म्हणाला Aaron Finch ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी 2024 च्या टी-ट्वेंटी विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेपर्यंत खेळत राहणं आपल्याला जमणार नाही याची जाणीव मला झाली. त्यामुळं निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ आहे असं मला वाटतं, असं फिंच म्हणाला आहे. मी वेळीच निर्णय घेतल्यामुळं टीमला नवीन खेळाडूंची निवड करण्यासाठी आणि आगामी स्पर्धेच्या तयारीसाठी वेळ मिळेल, असंही फिंच यावेळी म्हणाला आहे.




मी आपल्या कुटुंबात, विशेषत: माझी पत्नी एमी, माझ्या संघातील सदस्य, क्रिकेट व्हिक्टोरिया, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेटर्स असोसिएशनचे आभार मानू इच्छितो. ज्यांनी मला आवडणारा खेळ खेळण्याची परवानगी दिली. माझ्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मला पाठिंबा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानू इच्छितो, असंही फिंच यावेळी म्हणालाय.


आणखी वाचा - IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये KL Rahul चं खेळणं कठीण; BCCI कडून मोठं अपडेट


मी आपल्या कुटुंबात, विशेषत: माझी पत्नी एमी, माझ्या संघातील सदस्य, क्रिकेट व्हिक्टोरिया, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेटर्स असोसिएशनचे (Cricket Australia) आभार मानू इच्छितो. ज्यांनी मला आवडणारा खेळ खेळण्याची परवानगी दिली. माझ्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय (Aaron Finch Career) कारकिर्दीत मला पाठिंबा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानू इच्छितो, असंही फिंच यावेळी म्हणालाय.


आणखी वाचा - IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्याचा सामना करणार 'हा' सलामीवीर, Harbhajan Singh ने सुचवला सॉलिड पर्याय!


Aaron Finch चं करियर -


तब्बल 12 वर्ष फिंच ऑस्ट्रेलियासाठी खेळला आहे. दुबईत झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने फिंचच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप पटकावला. अ‍ॅरॉन फिंचने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे मालिकेतील शतक ठोकलं होतं. त्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा जगभर झाली. फिंचच्या करियरमधील ही संस्मरणीय खेळी ठरली.


फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया चॅम्पियन


मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियात T20 वर्ल्ड कप झाला. त्यावेळी एरॉन फिंचने ऑस्ट्रेलियाच नेतृत्व केलं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन टीम वर्ल्ड कपच्या सेमीफायनपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरली. दुखापतीमुळे तो टुर्नामेंटमधील अफगाणिस्तान विरुद्ध शेवटचा सामना खेळू शकला नव्हता. भले फिंचच नेतृत्व मागच्या वर्ल्ड कपमध्ये कमी पडलं असेल, पण त्याच्याच नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2021 मध्ये पहिल्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळी न्यूझीलंडला हरवून ऑस्ट्रेलियन टीमने चॅम्पियनशिपचा किताब जिंकला होता.


दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा  T20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून फिंचकडे पाहिलं जातं. टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचं मान उचावण्याचं काम फिंचीने केलंय. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना फिंचने 5 कसोटी सामने, 146 वनडे सामने तर 103 टी-ट्वेंटी सामने खेळले आहेत. त्यानं 76 टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलं आहे. त्यामुळे आता फिंचने फार घाई केली, अशी प्रतिक्रिया देखील क्रिडाविश्वातून येत असल्याचं पहायला मिळतंय.