KL Rahul Nagpur Test : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी भारत ऑस्ट्रेलियाविरूद्ध (IND vs AUS) 4 टेस्ट सामन्यांची सिरीज खेळणार आहे. 9 फेब्रुवारीपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) सुरुवात होणार आहे. या सिरीजमध्ये जर विजय मिळाला तर टीम इंडियाला (Team India) फायनलचं तिकीट मिळणार आहे. मात्र नागपूरमध्ये होणाऱ्या पहिल्या टेस्टपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचा ओपनर आणि स्टार खेळाडू के.एल राहुल (KL Rahul) पहिल्या टेस्टमध्ये खेळणार की नाही यावर प्रश्चचिन्ह उपस्थित झालं आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये चार सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जाणार आहे. नागपूरमध्ये पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलने नुकतंच त्याच्या लग्नासाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजमध्ये राहुल मैदानात खेळताना दिसणार आहे. मात्र याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
बीसीसीआय अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्सला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षात केएल राहुलला बऱ्याच दुखापती झाल्या. टेस्ट सामन्यांमध्ये त्याला विकेटकीपिंग करणं योग्य ठरणार नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये विकेटकीपरची गरज असते. टीममध्ये केएस भरत आणि ईशान किशन हे 2 स्पेशलिस्ट विकेटकीपर आहेत. त्यामुळे मॅनेजमेंट आता कोणाची निवड करते हे पाहणं महत्त्वाचं आहे.
भारतीय टीमचा सलामी फलंदाज भलेही सध्या त्याच्या खराब फॉर्ममुळे चर्चेत आहे, मात्र त्याचे टेस्ट क्रिकेटमधील आकडे फार चांगले आहेत. टीम इंडियासाठी त्याने आतापर्यंत 45 टेस्ट सामने खेळलेत. या सामन्यांमध्ये केएल राहुलने 34.26 त्या सरासरीने 2604 रन्स केले आहेत. यामध्ये 13 अर्धशतक आणि 7 शतकांचा समावेश आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मो. शमी, मो. सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट, सूर्यकुमार यादव.