Washington Sundar 7 Wickets Haul : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात तीन सामान्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यांच्यातील दुसरा सामना हा पुण्यात (Pune) खेळवला जात आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर दुसरा टेस्ट सामन्याचा आज पहिला दिवस असून यात टेस्ट क्रिकेटमध्ये तब्बल 1329 दिवसांनी कमबॅक करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) न्यूझीलंडचे 7 विकेट्स घेतले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील भारत विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट सीरिजला गुरुवार 23 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी झालेला टॉस न्यूझीलंडच्या कर्णधाराने जिंकला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी निवडली. तसेच टीम इंडियाला प्रथम गोलंदाजीची आव्हान दिले. कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये 3 महत्वाचे बदल करून केएल राहुल, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना बेंचवर बसवले तर या तिघांच्या जागी शुभमन गिल, आकाशदीप आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले आहे.


वॉशिंग्टन सुंदरचं जोरदार कमबॅक : 


25 वर्षीय ऑल राउंडर क्रिकेटर वॉशिंग्टन सुंदर याला मागील 3 वर्षात टीम इंडियाकडून टेस्ट क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नव्हती. वॉशिंग्टन सुंदरने त्याचा शेवटचा टेस्ट सामना हा 2021 मध्ये खेळला होता. बंगळुरू टेस्टमध्ये न्यूझीलंडकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर बीसीसीआयने ऑल राउंडर वॉशिंग्टन सुंदर याला टीम इंडियात संधी दिली. तर रोहित शर्माने त्याला प्लेईंग 11 चा देखील भाग केले.  वॉशिंग्टन सुंदरचं हे कमबॅक अतिशय जोरदार ठरलं आणि त्याने पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडच्या तब्बल 7 विकेट्स घेतल्या.  


हेही वाचा : धर्म प्रसारकाच्या कार्यक्रमात 'ही' भारतीय महिला क्रिकेटपटू मंत्र म्हणताच बेशुद्ध पडली अन्...



वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडला लोळवलं : 


न्यूझीलंड विरुद्ध गोलंदाजी करताना आर अश्विनने प्रथम 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने गोलंदाजीत आपला प्रभाव पडला. सुंदरने एका मागोमाग एक 7 विकेट्स घेऊन न्यूझीलंडच्या अर्ध्याहून अधिक टीमला लोळवलं. वॉशिंग्टन सुंदरने पहिले रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल यांना बाद केले. वॉशिंग्टन सुंदरने  एक तब्बल 7 विकेट्स घेतल्या आणि यामुळेच न्यूझीलंडला 259 धावांवर रोखणं टीम इंडियाला शक्य झालं. 


पुणे टेस्टसाठी टीम इंडियाची प्लेईंग : 


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप.