Womens T20 World Cup 2024 Semi-Final Scenario : आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2024 सध्या यूएईमध्ये खेळवला जात असून रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ग्रुप स्टेजचा सामना पार पडला.यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने भारतावर 9 धावांनी विजय मिळवला. हा सामना भारतासाठी सेमी फायनलमध्ये स्थान मिळवण्याकरता अत्यंत महत्वाचा होता. मात्र यात पराभूत झाल्यामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलमध्ये जाण अवघड झालं आहे. सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी आता टीम इंडियाला पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामान्याच्या निर्णयावर अवलंबून राहावं लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचे ग्रुप स्टेजमधील चारही सामने झाले आहेत. टीम इंडियाला हरवून 4 पैकी 4 सामने जिंकून ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा सेमी फायनलमध्ये क्वालिफाय झालीये. तेव्हा आता ग्रुप ए मधून सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी केवळ एकाच संघाची जागा आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळलेल्या टीम इंडियाच्या  महिला संघाने 2 सामन्यात विजय तर 2 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. सध्या पॉईंट्स टेबलमध्ये भारत 4 पैकी 2 सामने जिंकून 4 पॉईंट्स सह दुसऱ्या स्थानी आहे. तर न्यूझीलंडचा संघ 3 पैकी 2 सामानाने जिंकून 4 पॉईंट्स सह तिसऱ्या स्थानावर आहे. 


टीम इंडिया करणार पाकिस्तानच्या विजयाची प्रार्थना : 


सोमवारी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात शेवटचा ग्रुप स्टेज सामना खेळवण्यात येणार असून या सामान्यांच्या निर्णयावर कोणता संघ सेमी फायनलमध्ये पोहोचणार हे ठरेल. सोमवारी टीम इंडिया पाकिस्तानच्या विजयाची प्रार्थना करेल कारण जर पाकिस्तानने न्यूझीलंडला हरवले तर टीम इंडिया थेट सेमी फायनलमध्ये पोहोचेल.   


हेही वाचा : IND VS AUS : 'फक्त एक किंवा दोन खेळाडू...' पराभवानंतर भडकली कॅप्टन हरमनप्रीत, 'या' खेळाडूवर फोडलं पराभवाचं खापर


 


कसं आहे सेमी फायनलचं समीकरण?


न्यूझीलंड ग्रुप स्टेजमधील त्यांचा शेवटचा सामना खेळणार आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला असणं त्यांच्याकडे 4 पॉईंट्स आहेत. जर पाकिस्तान विरुद्ध किवी संघाने विजय मिळवला तर त्यांचे 6 पॉईंट्स होतील आणि ते सेमी फायनलमध्ये पोहोचणारी ग्रुप ए मधील दुसरी टीम ठरेल. तसेच पाकिस्तानने आतापर्यंत 3 पैकी एकाच सामन्यात विजय मिळवलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे फक्त 2 पॉईंट्स आहेत. जर पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडला  पराभूत करण्यात यशस्वी ठरला तर त्यांचे 4 पॉईंट्स होतील आणि न्यूझीलंडही 4 पॉईंट्सवर असेल. अशा परिस्थितीत भारताकडे फक्त 4 पॉईंट्स असूनही त्यांचा नेट रनरेट हा न्यूझीलंडपेक्षा जास्त असल्याने  टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहोचेल.